सर्वच बाजार १५ दिवस बंद करा, अन्यथा…; कुलदीप गायकवाड यांचा इशारा

कोल्हापूर: दुकाने बंद करावयाची असेल तर सर्वच दुकानांसह बाजारही बंद करा नाहीतर उद्या सराफ व्यावसायिक सर्वच दुकाने उघडतील, अशी माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज दिली. (kolhapur saraf traders association demands to close all markets for 15 days)

करोनाच्या वाढत्या पॉझिटिव्हिटी रेटच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू सोडून सर्वच दुकाने उद्यापासून पुन्हा बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी सराफ व्यापारी संघाच्या इमारतीमध्ये सराफी व्यावसायिक व महाद्वार रोडवरील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये गायकवाड बोलत होते.

क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची राजकीय टगेगिरी; आशीष शेलारांचा हल्लाबोल

ते म्हणाले, जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली आज बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. फक्त शहर नाही तर ग्रामीण भागातही गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र त्याचा भार पॉझिटिव्हिटी रेट वाढण्यावर होत आहे. अगदी वीकेंड लॉकडाउनचाही पूर्णता फज्जा उडल्याचे दिसते. पॉझिटिव्हिटी रेट कमी करावयाचा असेल तर सगळेच व्यवसाय, उद्योग बंद करा. हॉस्पिटल, मेडिकल आणि दूध सोडून बाकी सर्व बंद करा तरच रेट कमी येईल. असे करावयाचे नसेल तर सराफ व्यावसायिकांसह सर्वच दुकानदार उद्यापासून सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत शासनाच्या नियमांचे पालन करून दुकाने सुरू करतील.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ८,५३५ नव्या रुग्णांचे निदान, १५६ मृत्यू

यावेळी सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संचालक संजय जैन, शिवाजी पाटील, ललित गांधी, प्रसाद कालेकर, किशोर परमार आणि सभासद उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- फिरायला आलेल्या पर्यटकाचा पवना धरणात बुडून मृत्यू

Source link

close all market for 15 daysKolhapurkolhapur saraf tradersकुलदीप गायकवाडकोल्हापूरसर्वच बाजार १५ दिवस बंद करा
Comments (0)
Add Comment