हायलाइट्स:
- ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने मुंबईला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
- मुंबई महानगरपालिका अतिवृष्टीला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे.
- मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापालिकेच्या तयारीची माहिती दिली.
मुंबई: ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने मुंबईला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेत मुंबई महानगरपालिका अतिवृष्टीला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापालिकेच्या तयारीची माहिती दिली. (bmc is ready to face the heavy rainfall in mumbai after warning by the meteorological department)
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला. त्यावेळी चहल यांनी मुंबई महापालिकेच्या तयारीची माहिती दिली.
मुंबईतील लहान आणि मोठ्या नाल्यांची केलेली स्वच्छतेची कामे, मोठ्या नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण याची माहिती चहल यांनी या बैठकीत दिली. ते म्हणाले की, ‘यावर्षी पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप बसवण्यात आले असून याद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी ज्युनिअर इंजिनिअर स्पॉटवर राहून पाणी निचऱ्याचे काम करतील असेही ते म्हणाले.
हिंदमाता परिसरात विशेष व्यवस्था
क्लिक करा आणि वाचा- मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्याच्या महत्वाच्या सूचना
हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून यामध्ये परिसरात साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था केल्याचे ते म्हणाले. त्यांनी पालिका क्षेत्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनला निधी देऊन स्कॉड तयार केल्याची माहिती दिली. हे स्कॉड त्या वॉर्डमध्ये झाडे पडल्यास, हायटाईडमुळे अडचणी निर्माण झाल्यास त्याच्या निवारणाचे काम करतील, झाडं पडल्यास ते तत्काळ तिथून हटवून रस्ते वाहतूकीसाठी मोकळे राहतील याची काळजी घेण्यात आल्याचे सांगतांना त्यांनी प्रत्येक वार्डात मनपाच्या ५ शाळा तयार ठेवल्या असून गरजेनुसार लोकांना तिथे स्थलांतरीत केले जाईल असे सांगितले. एनजीओच्या मदतीने स्थलांतरीत लोकांच्या जेवणाची व्यवस्था केल्याची माहिती ही त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी साधला चित्रपट-टीव्ही मालिका निर्मात्यांशी संवाद; म्हणाले…
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांनी साधला चित्रपट-टीव्ही मालिका निर्मात्यांशी संवाद; म्हणाले…
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. लसीचे साठे ज्या शीतगृहात आहेत तिथे पॉवर बॅकअप दिल्याचेही ते म्हणाले. मुंबई महानगर पालिका रुग्णालये, शासकीय रुग्णालये, क्षेत्रातील कोविड सेंटर्सवर तसेच खासगी रुग्णालयांकडे ऑक्सीजनचा साठा पुरेसा असल्याबाबत, पॉवर बॅकअपच्या सुविधांकडे लक्ष देण्यास कळविण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यांनी जनरेटर्सची उपलब्धता, अतिरिक्त लागणारे जनरेटर्स, डिझेलचा साठा याची ही माहिती दिली.
क्लिक करा आणि वाचा- स्पुतनिक लशीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
सर्व जिल्हे आणि महापालिकाही सज्ज
याच बैठकीत विभागातील इतर महानगरपालिका आयुक्त, जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टीच्या काळात केलेल्या सर्व उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. सर्व यंत्रणा सज्ज आणि सतर्क केल्याचे सांगतांना त्यांनी धोकादायक इमारती, लो लाईन एरिया, दरडग्रस्त भाग आणि किनारपट्टीच्या ज्या भागात लोकांना स्थलांतरीत करण्याची गरज लक्षात घेऊन करण्यात येत असलेल्या उपाययोजना, कोविड रुग्णालयांची काळजी, ऑक्सीजन, डिझेलचा साठा, जनरेटर्सची व्यवस्था, दरडग्रस्त भागातील, धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर आदी कामांची माहिती ही दिली.