‘छत्रपतींची गादी ही पदापेक्षा मोठी; संभाजीराजेंनी राजीनामा द्यावा’

हायलाइट्स:

  • माजी आमदाराकडून संभाजीराजेंना राजीनामा देण्याचं आवाहन
  • छत्रपतींची गादी ही इतर कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे, असं म्हणत संभाजीराजेंना राजीनाम्याचं आवाहन
  • मराठा आरक्षणावरून भाजपवरही केला घणाघाती हल्ला

सोलापूर :मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करण्यात आल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) हे गेल्या काही दिवसांपासून राज्यभर फिरुन लोकांशी संवाद साधत आहेत. तसंच मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसदर्भात त्यांनी राज्य सरकारला अल्टीमेटमही दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आपलं नेतृत्व प्रस्थापित करू पाहात आहेत का, अशी चर्चाही सुरू झाली. अशातच कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी संभाजीराजेंना थेट पदाचा राजीनामा आवाहन केलं आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी हर्षवर्धन जाधव यांनी संभाजीराजे छत्रपती यांना पक्ष सोडून समाजासाठी लढा देण्याचं आवाहन केलं आहे. ते आज सोलापूरात बोलत होते.

Uddhav Thackeray: ‘निर्बंध पुन्हा कडक करावे लागले तरी…’; CM ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्देश

मराठा आरक्षणाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी हर्षवर्धन जाधव हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा सोलापुरातील शासकीय विश्रामगृहावर शिवप्रताप प्रतिष्ठानच्या वतीने हर्षवर्धन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जाधव यांनी संभाजीराजे यांनी आधी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी असं आवाहन केलं आहे.

मराठा आरक्षणावरुन भाजपवर हल्लाबोल

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती आरोप केले आहेत. ‘भाजपने मराठा समाजाला दोन वेळा आरक्षणाच्या मुद्द्यावर फसवलं आहे. आजही भाजप मराठा समाजाला फसवत आहे. त्यामुळे अराजकीय अजेंडा घ्यायचा असेल तर संभाजीराजे छत्रपती यांना भाजपकडून देण्यात आलेल्या खासदारकीचा त्याग करावा लागेल, तरंच समाजाच्या आंदोलनाला धार येईल,’ असं जाधव म्हणाले.

दरम्यान, छत्रपतींची गादी ही इतर कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे. त्यामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा आधी दिला तर समाज त्यांच्यासोबत जाईल, आम्हीही जाऊ,’ असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.

Source link

Maratha ReservationSambhaji Raje Chhatrapatiभाजप खासदारमराठा आरक्षणसंभाजीराजे छत्रपतीहर्षवर्धन जाधव
Comments (0)
Add Comment