गद्दारांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही , आदित्य ठाकरेंची प्रतिज्ञा ,भाषणातील टॉप टेन मुद्दे

मुंबई,दि.२६ :-एकनाथ शिंदेचे बंड मोडून  टाकण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह युवा नेते आदित्य ठाकरेही मैदानात उतरले आहेत. तर हे बंड मोडित काढण्याची प्रतिज्ञाच केली आहे. शिवसेनेने आज पुन्हा एकदा मुंबईत शक्ती प्रदर्शन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलेले दमदार भाषण चांगलेच चर्चेत आले आहे.

आदित्य ठाकरेंच्या भाषणातील टॉप टेन मुद्दे

20 मे रोजी एकनाथ शिंदेंना शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असे स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारले होते असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर एकनाथ शिंदेंनी टाळाटाळ केली होती.

यानंतर 20 जूनला एकनाथ शिंदेंनी बंड केले.

संदिपान भुमरे, संजय शिरसाट, जैस्वाल यांना मोठा फंड देण्यात आला असा खळबळजनक दावाही आदित्य यांनी भाषणात केला आहे.

धनुष्य बाण हे चिन्ह आपल्याकडेच राहणार. शिवसेनेवरचे प्रेम आपलेच राहणार असे म्हणत आदित्य ठाकरेंनी यांनी एकनाथ शिंदेनी स्थापन केलेल्या नविन गटाच्या वैधतेबाबतही भाष्य केले आहे.

एकनाथ शिंदे गटाकडे भाजपात किंवा प्रहारमध्ये विलिन होण्याचाच पर्याय आहे. त्यांचा स्वतंत्र गट होऊ शकणार नाही असेही आदित्य आपल्या भाषणात म्हणाले.

या बंडखोरांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही अशी थेट धमकीच आदित्य ठाकरे यांनी जाहीरपणे दिली आहे.

हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीत समोरासमोर या असे चॅलेंजही आजित्य ठाकरे यांनी दिले आहे.

दिलीप लांडे हातात हात घालून रडले होते. मात्र ते या बंडखोर गटासोबत कसे जाऊ शकतात, असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

15 ते 16 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. मात्र, बंडखोर, गद्दारांना क्षमा नाही असेही आदित्य ठाकरेंनी ठणकावले. अडीच वर्षे या सगळ्यांचे हिंदुत्व कुठे होते? हिंदुत्वातील ‘ह’ ही नव्हता असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केली.Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Shakti Zunzar. To Get Updates on Mobile, Download the Shakti Zunzar Mobile App for Android.

शक्ती झुंजार आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी Telegram , Whatsapp आणि Facebook आम्हाला जॉईन करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच  Subscribe करा.

Comments (0)
Add Comment