चोरीप्रकरणी पुण्यातील एकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे,दि.०६:-पुणे शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सलमान उस्मान शेख याचा अटकपूर्व जामीन पुणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी फेटाळला आहे. तक्रारीनुसार, सलमान उस्मान शेख यांनी दि ८ फेब्रुवारी २०२२ रोजी श्रीनाथ प्लाझा कमरर्शियल सोसायटीच्या पार्किंगमधून फ्रिज, कुलर, तीन आऊटडोअर एसी, कोको कोला कंपनीचा एक फ्रीज, दोन लाखांहून अधिक रुपयांचे असे साहित्य चोरले हो.आसे
तक्रारदार रिझवान रियाझ शेख याने त्याच दिवशी सलमान विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, सलमानने अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील जी. वेदपाठक यांच्याकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायाधीशांनी आपल्या आदेशात आरोपीचा अंतरिम किंवा अटकपूर्व जामीन फेटाळला.  न्यायालयाने पुढे सांगितले की, चोरीचे सामान जप्त करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे अर्जदाराची अटक आणि कोठडीत चौकशी करणे योग्य असल्याचे दिसते.
तक्रारदार रिझवान रियाझ शेख यांचे अॅड. बिलाल शेख यांनी झुंजार च्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. आरोपींना कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

Comments (0)
Add Comment