अतिक्रमणांची तक्रार करा आता’ व्हॉट्सअॅप’वर

पुणे,दि.०८ :- पुणे शहरातील अतिक्रमणांच्या तक्रारी आता पुण्यातील नागरिकांना व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर करता येणार आहे. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही सुविधा काही दिवसात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.शहरात महापालिकेवर प्रशासक नियुक्ती करण्यात आली असून महापालिकेकडून मोठया प्रमाणात रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे.
त्यात, प्रामुख्याने अनधिकृत पथारी व्यावसायिक तसेच महापालिकेकडून पुनर्वसन करून इतर ठिकाणी जागा दिल्यानंतरही पुन्हा त्याच जागेवर व्यावसायिक, रस्त्यावर वर्षानुवर्षे बेवारसपणे पडलेली वाहने अशा कारवाईचा त्यात समावेश आहे. अनेक भागात वारंवार अतिक्रमणे होत असल्याने महापालिकेने अनेक भागात फिक्स पॉईंटही लावलेले आहेत. मात्र, महापालिकेची कारवाई थोडी शिथील होताच पुन्हा अतिक्रमणेे होत आहेत.
त्यामुळे या पुढे पुणे शहरात नागरिकांना अतिक्रमणे दिसल्यास नागरिकांनी महापालिकेच्या पीएमसी केअर अ‍ॅपवरून, तसेच सोशल मीडिया हँडलवरूनही तक्रार केली जाते. मात्र, आता लवकरच यासाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देण्याचीही चाचपणी केली जात असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरातील अतिक्रमणांच्या तक्रारी आता नागरिकांना व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर करता येणार आहेत.

Comments (0)
Add Comment