पुणे,दि.८:-,पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडीवाला रोड परिसरात एका सराईत गुन्हेगाराने पोलीस कर्मचाऱ्याची गचांडी धरून त्याच्यासोबत धक्काबुक्की करत खाली पाडले.या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी एक ऐक सुमारास ही घटना घडली.
संघर्ष उर्फ भाव्या नितीन अडसूळ (वय 19, सारी पूल बुद्धविहाराजवळ ताडीवाला रोड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीस अंमलदार अमित एकनाथ बदे (वय 32) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या सुञानुसार, पोलीस अमलदार विशाल जाधव आणि फिर्यादी ताडीवाला परिसरात पेट्रोलिंग करत असताना आरोपी चारचाकी वर बसून हवेत लोखंडी कोयता उभारून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना .दमदाटी.करून . तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत .माजवायचा.प्रयत्न.करीत होता. फिर्यादीने आरोपीला पकडले असता त्याने फिर्यादी यांचीच गचांडी धरून धक्काबुक्की करत त्यांना खाली पाडले आणि सरकारी काम . मध्ये. त्यांना अडथळा निर्माण केला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.