भाजपविरोधात विरोधक मोर्चेबांधणी करत असताना चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

हायलाइट्स:

  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पत्रकारांशी संवाद
  • दिल्लीतील विरोधकांच्या मोर्चेबांधणीवर दिली प्रतिक्रिया
  • आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० जागा जिंकेल – पाटील

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘विरोधकांनी कितीही एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ द्या, कोणाच्याही नेतृत्वाखाली निवडणूक ते लढवू द्या, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप चारशेपेक्षा जास्त जागा जिंकेल,’ असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरात केला. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारला जनताच घरी पाठवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वाचा: पंकजा मुंडेंच्या सडेतोड भूमिकेवर भाजपची सावध प्रतिक्रिया

राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत या भेटीगाठी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी विचारले असता ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. प्रदेशाध्यक्ष पाटील म्ह्णाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर तीन, सहा महिन्यांनी लोकसभेबाबत लोकांचा फिडबॅक घेत आहेत. त्यामध्ये मतदार भाजपवर खूष असल्याचे दिसत आहे. कारण मोदींनीच अनेकांच्या घरी गॅस कनेक्शन दिले. विकासाच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. याचा फायदा २०२४ च्या निवडणुकीत भाजपला नक्की होणार आहे. त्यामुळे आमच्या या निवडणुकीत चारशेपेक्षा जादा जागा निवडून येतील.

वाचा: ‘हृदय दिल्लीत आणि मेंदू नागपुरात असणारे हे मायावी सरकार आहे’

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रोज वादग्रस्त विधान करत आहेत, त्यांच्या वक्तव्यांमुळं महाविकास आघाडी सरकार पडेल का असे विचारले असता पाटील म्हणाले, एकाने मारायचे आणि दुसऱ्याने समजवायचे असा खेळ सध्या राज्यात सुरू आहे. हा खेळ न कळण्याइतकी महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही. याची शिक्षा त्यांना येणाऱ्या निवडणुकीत मिळेल. सरकारचे जे नाटक सुरू आहे, त्याला जनता कंटाळली आहे. सत्तेचे महत्त्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे ते कितीही भांडले तरी सरकार पडू देणार नाहीत. पण, आगामी विधानसभा निवडणुकीत या सरकारला जनताच घरी पाठवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वाचा: ‘उद्धव ठाकरेंनी आषाढी एकादशीला शरद पवारांनाच अभिषेक करावा’

Source link

bjpchandrakant patilmaha vikas aghadiचंद्रकांत पाटीलभाजपमहाविकास आघाडीराहुल गांधीशरद पवारसोनिया गांधी
Comments (0)
Add Comment