याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ४ हजार २५९ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ६५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ९२८ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.
क्लिक करा आणि वाचा- ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता ६२ वर्षे
मुंबईत आज ३५ हजार ९६८ चाचण्या
मुंबईत आज एकूण ३५ हजार ९६८ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये ८ सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण ७५ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा- आरएसएस मुस्लिम भागात शाखा स्थापणार; संजय राऊत म्हणतात…
आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ६३५
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ५८२
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०४२५९
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ६९८९
रुग्ण दुपटीचा कालावधी- ९२८ दिवस
कोविड वाढीचा दर (०७ जून ते १३ जुलै)- ०.०७ %
क्लिक करा आणि वाचा- राज्यातील कारागृहे अतिक्रमणाच्या विळख्यात; जमिनींचा ताबा घेण्याच्या हालचाली सुरू
ठाण्यात आढळले ७८ नवे रुग्ण
दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात एकूण ७८ करोना बाधित नवे रुग्ण आढळले आहेत. तर एकूण ९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात एकूण ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३१ हजार ६८२ रुग्ण बरे झाले असून एकूण २ हजार ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.