(संपादक- शैलेश चौधरी)
एरंडोल येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नगरपालिकेतर्फे पात्र लाभार्थ्यांची विशेष बैठक घेऊन बांधकाम परवानगी व निधी वाटप करण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची विशेष बैठक १३ जुलै २०२१ रोजी होऊन ज्यांनी प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अद्याप पावेतो प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले नाही किंवा बांधकाम परवानगीसाठी अर्ज सादर केले नाहीत अश्यांना बांधकाम सुरू करण्याबाबत प्रोत्साहन देऊन त्यांना येत असलेल्या अडचणींवर चर्चा करण्यात आली, लाभार्थींना पंधरा दिवसांची मुदत वाढ देण्यात आली.त्यानंतर देखील बांधकाम सुरू न झाल्यास सदर लाभार्थ्याचे नाव मंजूर यादीतून वगळण्यात येईल अशी सूचनावजा समज देण्यात आली.
घराचे बांधकाम प्रगतिपथावर असलेल्या लाभार्थ्यांना शासनाचा प्रथम हप्ता (साठ हजार रुपये) लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला व तीन लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देण्यात आली.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पन्नास घरांचे काम पूर्ण झालेले आहे तसेच ३६ घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे नगराध्यक्ष रमेश परदेशी व मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी लाभार्थ्यांना लवकरात लवकर बांधकाम सुरू करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील,नगरसेवक मनोज पाटील,योगेश देवरे,कर निरीक्षक अजित भट,देवेंद्र शिंदे,योगेश सुकटे हे उपस्थित होते.
प्रास्ताविक एस.आर.ठाकूर यांनी,सूत्रसंचालन भूषण महाजन यांनी तर आभार प्रदर्शन सौरभ बागड यांनी केले