(संपादक -शैलेश चौधरी)
एरंडोल येथे जहांगिरपुरा भागातील दिपक हिम्मत अहिरे या २८ वर्षीय युवकाने १४जुलै २०२१ रोजी दुपारी राहत्या घरात घराच्या भिंतीला असलेल्या खुंटीला कमरेच्या बेल्टच्या साह्याने गळ्यात लटकावून गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली….
या घटनेच्या दिवशी दिपक ची आई लग्नासाठी बाहेर गावी गेली होती आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
मनोज लोटन महाजन यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्रीराम पाटील,पंकज पाटील,संदीप सातपुते व अकिल मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.