Pravin Darekar: ‘बळहीन झालेली राज्यातील जनता तुम्हाला पळ काढायला लावेल’

हायलाइट्स:

  • प्रवीण दरेकर यांनी साधला महाविकास आघाडीवर निशाणा.
  • शेतकरी, कामगाराला तुमच्या स्वबळात काहीच रस नाही.
  • बळहीन झालेली जनता तुम्हाला पळ काढायला लावेल!

लोणावळा: ‘महाविकास आघाडी सरकारच्या कर्मामुळे राज्यातील जनता, शेतकरी व कामगार यांच्या हातातलं बळ निघून गेलं आहे. हा घटक गलितगात्र झाला आहे. त्याला तुमच्या स्वबळामध्ये काहीच रस नाही,’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. जनता हतबल असताना आणि सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली असताना एकमेकांवर टीका करत नांदत राहायचं. स्वबळाचा नारा आणि पाळत ठेवण्याच्या प्रकारामुळे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले तरी सत्तेसाठी जुळवून घ्यायचं अशीच यांची वृत्ती आहे, असा निशाणाही दरेकर यांनी साधला. ( Pravin Darekar Slams Maha Vikas Aghadi Govt )

वाचा: उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री; १३ प्रमुख राज्यांत ‘असे’ झाले सर्वेक्षण

शिवक्रांती कामगार संघटनेच्या वतीने लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या कामगार प्रतिनिधी बैठकीत प्रवीण दरेकर बोलत होते. ‘महाविकास आघाडीला केवळ आपले सरकार कसे टिकेल यातच स्वारस्य आहे. आज जनतेच्या हातात आता बळ आणि ताकद जरी उरलेली नाही. त्यामुळेच ही भीषण स्थिती पाहता हीच जनता तुम्हाला सत्तेतून पायउतार करायला मागेपुढे पाहणार नाही,’ असा इशाराच दरेकर यांनी दिला. दरेकर म्हणाले, ‘याच व्यासपीठावरून आमचे मित्र व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला होता. प्रत्येक पक्षाला त्यांची काही मते असतात. त्यानुसार त्यांना स्वबळाचा नारा देण्याचा व पक्ष वाढविण्याचा अधिकारही आहे. परंतु, स्वबळाचा नारा देताना राज्याच्या जनतेची स्थितीही लक्षात घेतली पाहिजे. जनतेला तुमच्या स्वबळाचे काहीही देणेघेणे नाही. करोना मुळे जनता, शेतकरी, कामगार पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे.’

वाचा: शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार?; संजय राऊत यांनी केले मोठे विधान

करोना संकटात कामगाराला पगार व कामावर जायला यायला दळणवळणाची व्यवस्था नाही. तो कर्जबाजारी झाला आहे. बँकांकडून घेतलेले कर्जाचे हप्ते भरायला त्याच्याकडे पैसे नाहीत. त्याचे अवसान पूर्णपणे निघून गेले आहे. राज्यातील कामगाराप्रमाणे शेतकऱ्यांचीही अवस्था वाईट आहे. शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही, पिक विमा त्यांना मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. बेरोजगार तरुण कामाच्या प्रतीक्षेत आहे. तुमच्या स्वबळापेक्षा त्यांना त्यांचे कुटुंब, संसार आणि व्यवस्था कशी बळकट होणार याची चिंता लागली आहे. त्यांच्या हाताला बळ द्या, नाही तर तुमच्या कर्मामुळे बळहीन झालेली ही जनता कधी तुम्हाला पळ काढायला लावेल याचा नेम नाही, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

वाचा:
राज्यात निर्बंध शिथील होणार का?; ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Source link

pravin darekar latest newspravin darekar lonavala latest newspravin darekar on maha vikas aghadiPravin Darekar slams Maha Vikas Aghadipravin darekar slams maha vikas aghadi govtकरोनाकाँग्रेसनाना पटोलेप्रवीण दरेकरमहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment