मोठी बातमी : राजू साप्ते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

हायलाइट्स:

  • कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट
  • मुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटक
  • पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

पिंपरी : प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणातील (Raju Sapte Suicide Case) मुख्य आरोपी राकेश मौर्यला पोलिसांनी गुरुवारी (१५ जुलै)अटक केली. साप्ते यांनी त्यांच्या ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांच्या बिझनेस पार्टनरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सुरुवातीला बिझनेस पार्टनरसह तिघांना अटक देखील केली. त्यानंतर साप्ते यांना धमकवणाऱ्या राकेश मौर्यला पोलिसांनी अटक केली आहे.

Jalgaon Rains Update जळगाव: पुरात बैलगाडीसह शेतकरी दाम्पत्य वाहून गेलं; पत्नी बचावली पण…

राकेश सत्यनारायण मौर्य (वय ४७, रा. कांदिवली ईस्ट, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी चंदन रामकृष्ण ठाकरे (वय ३६, रा. एकतानगर, कांदिवली वेस्ट, मुंबई) याला अटक केली आहे. या दोघांसह नरेश विश्वकर्मा (मिस्त्री), गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई), अशोक दुबे (सर्व रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोनाली राजेश साप्ते (वय ४५, रा. ताथवडे. सध्या रा. कांदिवली वेस्ट, मुंबई) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साप्ते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश मौर्य हा गुरुवारी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी शिवाजीनगर कोर्टात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार किज हॉटेल येथे सापळा रचून पोलिसांनी मौर्य याला अटक केली. आतापर्यंत या गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Source link

pimpari chinchwadsuicide caseआत्महत्या प्रकरणकला दिग्दर्शकपिंपरी चिंचवडमराठी चित्रपट
Comments (0)
Add Comment