Aslam Shaikh: निर्बंध शिथील करण्याबाबत सरकार सकारात्मक; अस्लम शेख म्हणाले…

हायलाइट्स:

  • कोविड निर्बंधांबाबत अस्लम शेख यांचे मोठे विधान.
  • निर्बंध शिथील करण्याबाबत सरकार सकारात्मक.
  • हॉटेल व्यवसाय, व्यापारी वर्गाला मिळणार दिलासा.

मुंबई: राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली असल्याने मुंबईसह राज्यात निर्बंध आणखी शिथील करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, तसा कोणताच निर्णय बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला नाही. त्यामुळे निर्बंध शिथील होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या विविध घटकांचा हिरमोड झाला असतानाच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज महत्त्वाची माहिती दिली आहे. ( Aslam Shaikh On Maharashtra Lockdown )

वाचा:‘किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपती पदाचा उमेदवार तरी बनवा…’

अस्लम शेख यांना आज निर्बंधांबाबत विचारणा करण्यात आली असता येत्या काही दिवसांत निर्बंध शिथील होऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत. निर्बंध शिथील करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. त्यात हॉटेल व्यवसाय, व्यापारी, कापड उद्योग यांना कशाप्रकारे सूट द्यायची व सर्व व्यवहार सुरळीत कसे करायचे यावर विचार केला जात आहे, असे शेख यांनी सांगितले. अनलॉक प्रक्रिया रखडण्यास एकप्रकारे केंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगण्याचा शेख यांनी प्रयत्न केला. राज्य अनलॉक होण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, केंद्र सरकारकडून पुरेसा लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला असून अनलॉकच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात त्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे, असे शेख म्हणाले.

वाचा: ठाकरे सरकारने आणले साहसी पर्यटन धोरण; आदित्य यांनी सांगितला मेगाप्लान

दरम्यान, मुंबई लोकल सेवा सर्वांसाठी कधी सुरू होणार, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कोविडवरील लसचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली होती. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर बोट ठेवत राज्यात आहेत ते निर्बंध कायम ठेवण्याचे राज्य सरकारने निश्चित केले. यावर बोलताना कोविडवरील लसचे दोन्ही डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार सुरू असल्याचे शेख यांनी सांगितले.

वाचा:काँग्रेस नेते सायकलवरून राजभवनात; राज्यपालांकडे केली ‘ही’ मागणी

Source link

aslam shaikh on maharashtra lockdownaslam shaikh on mumbai lockdownmaharashtra lockdown latest newsMumbai Local Train Latest Updatemumbai lockdown latest newsअनलॉकअस्लम शेखकरोनामुंबई लोकललसीकरण
Comments (0)
Add Comment