कार्यक्षम नगरसेविका सौ. आरतीताई सचिन कोंढरे यांच्या पाठपुराव्याला यश

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

कार्यक्षम नगरसेविका सौ. आरतीताई सचिन कोंढरे यांच्या पाठपुराव्याला यश
नागझरी नाल्याच्या सिमारक्षक भिंतीचे व संबंधित पुलाच्या कलवर्टचे काम येत्या दहा दिवसांत सुरू होणार….

लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर प्रभागात नागझरी नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांचे दर पावसाळ्यात होणारे हाल प्रकर्षाने पुढे आले होते. पावसाळ्यात नाल्यातील पाण्याची पातळी प्रचंड वाढून सर्व पाणी नागरिकांच्या वस्ती मध्ये शिरत होते. त्यांचे नाहक हाल नागरिकांना सहन करावं लागत होत.. सन २०१८-१९ मध्ये आंबील ओढ्यामध्ये आलेले अतिरीक्त पाणी आणि त्यामुळे तेथील नागरिकांची झालेली दुर्दशा लक्षात घेता या गोष्टीची प्रभागातील नागझरी नाल्याबाबतीत पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून त्याचं वेळी तातडीने लोकांची प्रतिनिधी या नात्याने आरती कोंढरे यांनी प्रशासनाला नागझरी नाल्यावरील सीमारक्षक भिंत बांधणे, सर्व पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करणे, नाल्यावरील कलवर्ट दुरुस्त करणे, वारंवार नाला साफसफाई करणे, याची मागणी केली होती. या अनुषंगाने गेली तीन वर्षे सातत्याने प्रशासनाकडे या बाबतीचा आरती ताईं कडून पाठपुरावा केला गेला. वेळेनुसार सतत संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका लावुन, अधिकारांना खडसावून कामे करण्यास सांगितले.

SHIFA MOBILE. 9028293338


या सर्व बाबींचा कायमस्वरूपी उपाय म्हणून नाल्याची सीमरक्षक भिंत बांधण्यासाठी व टिंबर मार्केट-लहुजी वस्ताद चौक-दुधभट्टी येथील पुलावर कलवर्टर बसवण्यासाठी व सीमा भिंत उंच करण्यासाठी गेल्या अर्थसंकल्पात आरती ताईंनी महापालिकेच्या बजेटमध्ये तरतूद उपलब्ध करून घेतली होती. परंतु, पुढील काळात कोरोना प्रतिबंधनामुळे सर्व कामे रखडली गेली. आता पुन्हा या वर्षीच्या बजेटमध्ये आरती ताईंकडून संबधित कामासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये तरतूद उपलब्ध करण्यासाठी धडपड केली गेली. ताईंनी वारंवार समंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन, पत्रव्यवहार करून संबधित कामे तातडीने करण्यास सांगितले. अखेरीस, ताईंच्या धावपळीला यश येऊन, महापालिकेच्या यंदाच्या बजेट मध्ये आयुक्त यांनी रु. १ कोटी एवढी तरतूद, आरती ताईंच्या मागणीनुसार नागझरी नाल्यावरील कलवर्टर बसवण्यास व तत्सम कामे करण्यास दिली आहे. येत्या ८-१० दिवसांत संबंधित कामाचे टेंडर निघणार असून लवकरच आरती ताईंच्या विशेष प्रयत्नामुळे नागझरी नाल्यावर कलवर्टर बसवण्यात येणार आहे…

विशेष म्हणजे, काही दिवसाआधीच ताईंनी स्वतः पुढाकार घेऊन या सर्व नाल्यांची साफसफाई करून घेतली आहे. या सर्वांमुळे, निश्चितच तेथील नागरिकांचा त्रास कमी होऊन, त्यांना उत्तम परिसराची ग्वाही मिळेल…..

Comments (0)
Add Comment