भुसावळ शहर हे पुन्हा खुनाने हादरले असून शहरातील जामनेर रोडवरील श्रध्दा कॉलनीजवळील गजानन महाराज मंदिराच्या समोर मध्यरात्रीनंतर एका तरूणाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
या तरूणाची ओळख मिटविण्यासाठी चेहरा दगडांनी ठेचून टाकण्यात आला आहे.मयत तरूणाचे वय ३५ते४० च्या आसपास आहे.
पहाटे या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे,बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान येथे तरुणाचा खून कोणी व का केला? या कारणांचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून अज्ञात मारेकर्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहीले आहे.