ajit pawar replys on nana patole’s statements: नाना पटोले काहीही बोलोत, आघाडीला धोका नाही; अजित पवारांचा टोला

हायलाइट्स:

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांना टोला हाणला आहे
  • नाना पटोले कोणतीही विधाने केली तरी आघाडीला धोका नाही – अजित पवार.
  • आमची बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे- अजित पवार.

पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देतानाच, आपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याचे खळबळजनक विधान केले होते. त्यानंतर आता आघाडीत बिघाडी होणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, या स्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. नाना पटोले यांनी कोणतीही विधाने केली, तरी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याशीही चर्चा झाली आहे. त्यामुळे आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. (no matter what statements nana patole makes the alliance government is not in danger says ajit pawar)

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत धुसपुस सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पटोलेंच्या वक्तव्यामुळे आघाडीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. नाना पटोलेंसारख्या लहान माणसांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, असे शरद पवार यांनी थेट सुनावल्याने महाविकास आघाडीतील संबंधांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले. त्यानंतर पटोले यांनी शरद पवार हे ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल असल्याची टीकाही केली.

क्लिक करा आणि वाचा- ‘जे मंदिरांना टाळे लावतात, ते वारकऱ्यांची काय काळजी घेणार?’; प्रवीण दरेकरांचा आघाडी सरकारवर निशाणा

आता आघाडीत बिघाडी होतो की काय असे वातावरण तयार होत असताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, अशोक चव्हाण आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली.

पटोले यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करत पटोले यांना टोला हाणला. आम्ही काँग्रेस हायकमांडचे प्रतिनिधी असलेल्या एच. के. पाटील यांच्या बोलण्याला महत्त्व देतो. बाकीचे काय बोलतात त्याला महत्त्व नाही, असे पटेल यांनी म्हटले.

क्लिक करा आणि वाचा- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला शिवसनेची १० लाख रुपयांची मदत, दिले ‘हे’ आश्वासन

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. या पुढे नाना पटोले यांच्या वक्तव्याला महत्व द्यायचे नाही, असेच संकेत अजित पवार यांनी आपल्या आजच्या वक्तव्यातून दिले आहेत. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एकटे पडतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा- बहुमत आहे, तर मग घाबरता कशाला?; विधानसभा अध्यक्ष निवडीवरून फडणवीसांचा टोला

Source link

ajit pawarMahaVikas Aghadi (MVA) governmentNana Patoleअजित पवारआघाडी सरकारला धोका नाहीनाना पटोले
Comments (0)
Add Comment