मुख्यमंत्र्यांसोबत ‘या’ वारकरी जोडीला मिळणार आषाढीच्या पूजेचा मान

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्र्यांसोबत ‘या’ वारकरी जोडीला मिळणार आषाढीच्या पूजेचा मान
  • सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती
  • ईश्‍वर चिठ्ठीद्वारे करण्यात आली निवड

सोलापूर : करोना प्रादुर्भावामुळे पंढरपूरची आषाढी यात्रा ही प्रतिकात्मक साजरी होत असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे २० जुलै रोजी पहाटे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेची सपत्नीक शासकीय महापूजा करणार आहेत. त्यांच्या समवेत महापूजेचा मान मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी सौ. इंदुबाई यांना मिळाला आहे, अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

मानाचे वारकरी असणारे केशव कोलते हे विदर्भातील वर्धा येथील असून त्यांचे वय ७१ वर्षे आहे. गेल्या वीस वर्षापासून ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेत. मागील वर्षीपासून वारी भरत नसल्याने महापूजेचा मान विणेकर्‍यांना देण्याचा निर्णय समितीने घेतला होता. त्यानुसार यंदा केशव कोलते यांना हा मान देण्यात आला आहे.
कुऱ्हाडीचे घाव घालून मेव्हण्याचा खून; मुक्ताईनगरमधील घटनेने खळबळ
केशव कोलते यांची निवड ईश्‍वर चिठ्ठीद्वारे करण्यात आली असून यासाठी दोन विणेकरी यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या. यात बापू साळुजी मुळीक यांचाही समावेश होता. यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, प्रकाश जवंजाळ महाराज, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हे उपस्थित होते.
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, सायकल रॅली काढून संताप व्यक्त

मुख्यमंत्र्यांसोबत ‘या’ वारकरी जोडीला मिळणार आषाढीच्या पूजेचा मान

Source link

ashadhi ekadashi mahapujaAshadhi Ekadashi pujaashadi ekadashi 2021ashadi ekadashi 2021 dateashadi ekadashi marathichief ministerwardha warkari
Comments (0)
Add Comment