ही आहे खरी प्रेमाची ताकद! नेत्रहीन असूनही एकमेकांना आयुष्यभर साथ देणार शाम आणि माया

हायलाइट्स:

  • सात जन्माच्या बंधनात अडकले नेत्रहीन शाम आणि माया
  • दृष्टीहीन जोडप्यांचा आगळावेगळा विवाह
  • ही आहे खरी प्रेमाची ताकद!

जालना : जालना शहरात आज कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्था संचलित बेघर निवारा केंद्राच्यावतीने नेत्रहीन जोडप्याचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल, कैलास ब्रिगेडचे अध्यक्ष अरुण सरदार हे प्रमुख पाहुणे तर शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांनी खास उपस्थिती लावली.

श्याम तांबे आणि माया कांबळे असं या नवदाम्पत्याचं नाव आहे. कैलास ब्रिगेड ही सामाजिक संस्था गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबविणारी ही संस्था जालना शहरातील रेल्वे स्थानक मार्गावर आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून बेघरांना आधार देण्याचे कार्य करीत आहे. या आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ही संस्था रागाच्या भरात निघून आलेल्या वृध्द व्यक्तींना आपुलकीने वागणूक देवून त्यांची काळजी घेते.
मुख्यमंत्र्यांसोबत ‘या’ वारकरी जोडीला मिळणार आषाढीच्या पूजेचा मान
या बेघर निवारा केंद्रात २४ जून २०२१ रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील तांबारातूरी येथील शाम बाबा तांबे हा ३८ वर्षीय दृष्टीहीन तरूण दाखल झाला. गायनाचा छंद असलेल्या शाम तांबे हा उत्तम हस्तकलाकारही आहे. तांबे हा आपुलकी बेघर निवारा केंद्रात दाखल झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील खांडवा येथील माया महादेव कांबळे ही ३६ वर्षीय बेघर दृष्टीहीन तरुणी आपुलकी बेपर निवारा केंद्रात दिनांक ३० जून रोजी दाखल झाली होती.

आपुलकी परिवाराने या दृष्टीहीन जोडप्यांचा आगळावेगळा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. आमदार कैलास गोरंट्याल यांनी या नेत्रहीन जोडप्यांच्या विवाहासाठी मोलाचे सहकार्य केले. या दृष्टीहीन जोडप्यांच्या विवाहासाठी पालकत्व स्वीकारण्याबाबत या संस्थेने आवाहनही केले होते. या आवाहनास जालना शहरातील सामाजिक संस्थांनी प्रतिसाद देत शाम – मायाच्या संसारासाठी अनेक हात पुढे आले. त्यामुळेच हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.
बापरे! चिमुकल्याने गिळला बॅटरीचा सेल, डॉक्टरांनी असा बाहेर काढला की वाचून थक्क व्हाल

Source link

blind couple get marriedinspirational marriagejalna newsjalna news marathijalna news todayjalna news today livemarriage inspirational stories
Comments (0)
Add Comment