हायलाइट्स:
- शिरपूर येथिल ट्रेनर एअर क्रॉफ्ट अर्थात वैमानिकांना प्रशिक्षण देणारे एक विमान जळगाव जिल्ह्यात कोसळले.
- या दुर्घटनेत प्रशिक्षक वैमानिकाचा मृत्यू झाला तर प्रशिक्षणार्थी तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
- कॅप्टन नूरल अमीन (वय ३०) असे मृत वैमानिकाचे नाव आहे. तर अपघातात प्रशिक्षणार्थी अंशिका गुजर (वय २४) जखमी झाली आहे.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
शिरपूर येथिल ट्रेनर एअर क्रॉफ्ट अर्थात वैमानिकांना प्रशिक्षण देणारे एक विमान जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या वर्डी शिवारातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात कोसळले. या दुर्घटनेत प्रशिक्षक वैमानिकाचा मृत्यू झाला तर प्रशिक्षणार्थी तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना आज दुपारी चार वाजता घडली. कॅप्टन नूरल अमीन (वय ३०) असे मृत वैमानिकाचे नाव आहे. तर अपघातात प्रशिक्षणार्थी अंशिका गुजर (वय २४) जखमी झाली आहे.
वर्डी गावापासून सुमारे तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रामतलाव परिसरातील घनदाट जंगलात हे विमान कोसळले आहे. हा अतिशय भाग दुर्गम आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील ‘एसव्हीकेएम’ मंडळाच्या निम्स अकॅडमी ऑफ एव्हिएशनचे हे शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देणारे विमान होते. आज शुक्रवारी सकाळी अकॅडमीकडून नेहमीप्रमाणे शिकाऊ वैमानिकांना विमान उडवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.
क्लिक करा आणि वाचा- भुसावळ शहरात अज्ञात तरुणाचा निर्घृण खून; दगडाने ठेचला चेहरा
दुपारी अकॅडमीचे प्रशिक्षक कॅप्टन नूरल अमीन आणि प्रशिक्षणार्थी महिला वैमानिक अंशिका गुजर या दोघांनी विमानाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास विमान हवेतून जमिनीवर कोसळले. दिशा भरकटून विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत कॅप्टन नूरल अमीन हे ठार झाले तर प्रशिक्षणार्थी महिला वैमानिक अंशिका गुजर ही गंभीर जखमी झाली.
क्लिक करा आणि वाचा- नाना पटोले काहीही बोलोत, आघाडीला धोका नाही; अजित पवारांचा टोला
आवाज ऐकताच ग्रामस्थांची धाव
सातपुड्याच्या जंगलात गुरे चारणाऱ्या गुरख्यांच्या लक्षात आली. तालुक्यातील वर्डी गावाच्या जगलात मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी जंगल परिसरात धाव घेतली, गावकरी घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमी महिला वैमानिक अंशिका गुजर हिला तातडीने उपचारासाठी चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तहसीलदार रावसाहेब गावीत, सहाय्यक साहाय्यक निरीक्षक दांडगे घटनास्थळी तातडीने पोहचले होते.
क्लिक करा आणि वाचा- बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन; गेल्या वर्षीचेच निर्बंध कायम