हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ७ हजार ७६१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण १३ हजार ४५२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण १६७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ७ हजार ७६१ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले असून कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत किंचित घट झाल्याचे दिसत आहे. काल ८ हजार ०१० रुग्णांचे निदान झाले होते. तर, आज एकूण १३ हजार ४५२ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज एकूण १६७ रुग्णांनी प्राण गमावले आहेत. (maharashtra registered 7761 new cases in a day with 13452 patients recovered and 167 deaths today)
आजच्या १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ६५ हजार ६४४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२७ टक्के एवढे झाले आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०१ हजार ३३७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १७ हजार ०९६ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १५ हजार ८२६ इतके रुग्ण आहेत. तर, मुंबई महापालिका हद्दीत सध्या १० हजार ९१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर सांगलीत सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. सांगलीत ही संख्या ९ हजार ९२० इतकी आहे. तर, कोल्हापुरात ही संख्या ९ हजार ५२९ इतकी आहे. , साताऱ्यात ही संख्या ७ हजार १८८, रायगडमध्ये ३ हजार १७२, रत्नागिरीत ३ हजार २२४, सिंधुदुर्गात २ हजार ४८१, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार १५० इतकी आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या २ हजार ३०० इतकी झाली आहे.
क्लिक करा आणि वाचा- जळगावात कोसळलेले ‘ते’ विमान प्रशिक्षण देणारे, वैमानिकाचा मृत्यू
चंद्रपूरमध्ये फक्त १६ सक्रिय रुग्ण
या बरोबरच, अहमदनगरमध्ये ३ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, औरंगाबादमध्ये ५८८, नांदेडमध्ये ही संख्या ४६४ इतकी आहे. जळगावमध्ये ५०८, तसेच अमरावतीत ही संख्या १९७ इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १६ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- अडीच हजार कोटींच्या थकबाकीने महावितरणालाच शॉक; आर्थिक स्थिती डबघाईला
५,८५,९६७ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५० लाख ३९ हजार ६१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१ लाख ८९ हजार २५७ (१३.८१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८५ हजार ९६७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ४ हजार ५७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
क्लिक करा आणि वाचा- नाना पटोले काहीही बोलोत, आघाडीला धोका नाही; अजित पवारांचा टोला