नगरसेविका आरती कोंढरे च्या पुढाकाराने झालेत काशीकापडी समाजातील व्यावसायिकांचे विशेष मोहिम अंतर्गत सरसकट लसीकरण

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

आरती ताईंच्या पुढाकाराने झालेत काशीकापडी समाजातील व्यावसायिकांचे विशेष मोहिम अंतर्गत सरसकट लसीकरण..!

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असणारा काशीकापडी समाज दैनंदिन कपड्यांचा व्यवसाय करून आपली उपजीविका चालवतो. आधीच कोरोणाकाळात या समाजबांधवांचे हाल झाले असताना, आता लसीकरण घेतल्याशिवाय व्यवसाय करता येणार नसल्याने या बांधवांना प्रचंड हाल सोसावे लागत आहे. त्यातही लसीच्या बुकींग साठी तंत्रज्ञानाचा व साहित्याचा अभाव असल्यामुळे हा घटक लसीकरनापासून वंचित राहिला होता.. हे लक्षात येताच प्रभागातील कार्यक्षम नगरसेविका सौ. आरती सचिन कोढरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन काशीकापडी समाजासाठी विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीची व्यवस्था केली


शिवभक्त कै. बाळूअण्णा व्यंकटेश आंदेकर यांच्या ३७ व्या स्मृतिदिनानिमित्त नगरसेविका सौ. आरती सचिन कोंढरे यांच्या विशेष प्रयत्नातून आज(दि. १६ जुलै) ‘पांचवाणिक विसानागार सांस्कृतिक भवन’ येथे “विशेष लसीकरण शिबिर” आयोजित करण्यात आले होते.. या माध्यमातून काशीकापडी समजातील जवळपास १५०+ नागरिकांचे एकाच वेळी लसीकरण करण्यात आले.

आरती ताईंच्या माध्यमातून नागरिकांची ऑनलाईन नोंदणी करण्यापासून त्यांना लस देऊन पुढल्या डोसचे सर्व नियोजन सांगण्यापर्यंत नियोजन करण्यात आले.


या वेळेस ताईंनी आंदेकर परिवारातर्फे आयोजित रक्तदान शिबिरास सुद्धा भेट दिली व सर्व आयोजकांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

Comments (0)
Add Comment