एरंडोल- येथील एकलव्य संघटना तालुका कमिटीची आढावा बैठक नुकतीच शासकीय विश्राम गृह येथे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस तालुक्यातील पदाधिकारी आणि आदीवासी भिल्ल समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाघ यांनी उपस्थित पदाधिकारी,कार्यकर्ते आणि समाज बांधव यांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, भारत स्वतंत्र होऊन ७०ते७५ वर्षे झाली तरी आदीवासी समाजातील मूलभूत प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. दफनभूमीचा प्रश्न असो वा रहात्या घराच्या जागांचा प्रश्न किंवा शासनाच्या कुठल्याही योजनेचा प्रश्न असो शासनाने कोणत्याही गोष्टींची पूर्तता केलेली नाही म्हणून आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला. यावेळी तालुक्यातील तळई येथे एकलव्य संघटनेचे शाखा उद्घाटन जिल्हाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.तसेच तळई आणि एरंडोल येथे तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील १५० ते २०० आदीवासी भिल्ल समाज बांधवांना रेशनकार्ड देखिल संघटनेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष रवि सोनवणे,अपंग सेल जिल्हाध्यक्ष ऋषी सोनवणे,विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार,एरंडोल शहरप्रमुख पिंटूभाऊ सोनवणे,युवा तालुकाध्यक्ष वाल्मिक सोनवणे,तालुकाउपाध्यक्ष विजय मोरे,सचिव लक्ष्मण गायकवाड,शहर उपाध्यक्ष विनोद मालचे,विद्यार्थी तालुकाध्यक्ष राहूल सोनवणे,तळई शाखा प्रमुख सुनिल भिल्ल,सरपंच भाईदास नाईक यांचेसह तालुक्यातील आदीवासी भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.