एरंडोल तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९९.९४%

(शैलेश चौधरी )

एरंडोल – इयत्ता दहावीचा तालुक्याचा निकाल ९९.९४% लागला आहे.दरम्यान कल्पना समाधान पाटील(रवंजे) या विद्यार्थिनीचे आकस्मित निधन झाले तिचे इयत्ता नववीचे गुण प्रविष्ट झाले होते परंतु इयत्ता दहावीच्या गुणांचे मूल्यमापन न झाल्यामुळे तालुक्‍याचा निकाल शंभर टक्के च्या आत लागला आहे.
बी.के.माध्यमिक विद्यालय आडगाव या शाळेचा निकाल ९२.२०% टक्के लागला आहे संस्थाध्यक्ष शालिग्राम पाटील व मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. रा.ती.काबरे विद्यालय एरंडोल चा निकाल शंभर टक्के लागला असून एसएससी परीक्षेला या शाळेचे ३२६ विद्यार्थी प्रविष्ट होते ते सर्व उत्तीर्ण झाले प्रथम क्रमांक मुक्ताई संजय मराठे या विद्यार्थिनीने मिळवला असून तिला ९६.४० टक्के गुण मिळाले हेरंब सुनील महाजन या विद्यार्थ्याने शेकडा ९६.२० गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तर तृतीय क्रमांक श्रद्धा फकीरा चौधरी या विद्यार्थिनीला ९५.२० टक्के गुण मिळाले या शाळेचे एकशे अकरा विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने,उपमुख्याध्यापिका एस.ए.पाटील,पर्यवेक्षक नरेश डागा व ए आर मालू यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
एरंडोल तालुक्यात १९७९ विद्यार्थी प्रविष्ट होते ते सर्व उत्तीर्ण झाले,४९४ विद्यार्थी विशेष प्राविण्याने पास झाले प्रथम श्रेणीत १०९५ विद्यार्थी यशस्वी झाले,द्वितीय श्रेणीत १८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, गौरीशंकर माध्यमिक विद्यालय रवंजे या शाळेचा निकाल ९८ टक्के लागला आहे तर महात्मा फुले हायस्कूल एरंडोल चा निकाल सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला आहे संस्थाध्यक्ष विजय महाजन व चेअरमन अरुण माळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे ग्रामीण उन्नती विद्यालयाचा सुद्धा निकाल शंभर टक्के लागला आहे. संस्थाध्यक्ष सचिन विसपुते व मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Comments (0)
Add Comment