कांदा विक्री न करण्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे आवाहन

नाशिक,दि.१६: – कांदा बाजारभाव संदर्भात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 16 ऑगस्ट पासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये स्वयंस्फूर्तीने कांदा बेमुदत विक्री न करण्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आवाहन केले आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा विक्री न करण्याचा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवला असून यावेळी कोणी शेतकर्‍यांनी आपला कांदा बाजार समितीची आणू नये असे आवाहन या संघटनेचे वतीने करण्यात आले असून केंद्र व राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे धोरण अवलंबत नसून शेतकऱ्याला  22 ते 25 रुपये खर्च कांदा उत्पादनासाठी खर्च येतो मात्र आठ ते नऊ रुपये किलो भाव हातात मिळत असून कांदा बियाणे तसेच रासायनिक खतांच्या किमती वाढल्या असल्याने मिळणारा भाव हा शेतकऱ्याला परवडत नसल्याने  कांद्याच्या भावात सुधारणा व्हावी याकरता हा स्वयंस्फूर्तीचा बंद आज ठेवण्यात आला असून या आव्हानाला कांदा उत्पादक शेतकरी किती प्रतिसाद देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले.

 

Comments (0)
Add Comment