१०२६ कोटीचा एमडी ड्रग्स जप्त , मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई,दि.१६:- मुंबई पोलीस अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटनं थेट गुजरातमध्ये जाऊन ड्रग्ज माफियांविरोधात धडक कारवाई केली आहे.गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर परिसरातील एका ड्रग्ज फॅक्ट्रीचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. यासोबतच जवळपास ५१३ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल १,०२६ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.छापा टाकण्यात आलेल्या ड्रग्ज फॅक्ट्रीमधून सात जणांना अटक देखील केली गेली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. राज्यात ड्रग्ज आणि कोकिन माफिया गँग विरोधात मुंबई पोलिसांनी मोठी आघाडी उघडली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात आक्रमक भूमिका घेत कारवाई केली आहे.मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागाने याच महिन्याच्या सुरुवातीला नालासोपारा शहरातून १,४०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आढळून आल्यानंतर नालासोपारा शहरात खळबळ माजली होती. नालासोपारामध्ये याआधी अनेकदा अंमली पदार्थांविरोधात कारवाई झाली आहे. पण पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात पोलिसांना यश आलं होतं. तसंच २६ मे रोजी गुजरातमधील बंदरावरुन पोलिसांनी २६ किलो कोकेन जप्त केले होते. याची किंमत जवळपास ५०० कोटी रुपयांच्या घरात होती. आरोपी ड्रग्जला चक्क मीठ असल्याचं सांगून इराणला घेऊन जात होते.
सदरची कारवाई मा पोलीस आयुक्त . विवेक फणसळकर , पोलीस सह आयुक्त ( गुन्हे ) , डॉ . सुहास वारके, अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , विरेश प्रभु, पोलीस उप आयुक्त , दत्ता नलावडे सोप , व मा . सहाय्यक पोलीस आयुक्त , सावळाराम आगवणे , अंमली पदार्थ विरोधी कक्ष , मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष , वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप काळे , आझाद मैदान युनिटचे प्रभारी राजेंद्र दहीफळे , वरळी युनिटचे स.पो.नि. संतोष साळुंखे , बाद्रा युनिटचे स.पो.नि. सुरेश भोये , वरळी युनिटचे स.पो.नि. अमोल कदम , पो.उ.नि. रविंद्र सावंत , पो.उ.नि. शैलेश देसाई , स.फौ.क्र . २८ ९९ २ / सुरेश साळुंखे , पो.ह.क्र . ९ ७०६४ ९ / सुधीर साळुंखे , पो.ना.क्र . ०३-६५४ / राजु तडवी , पो.ना. क्र . ०३ – ९ १७ / हरीश राठोड , पो.ना. क्र . ०३-१२४६ / राजदिप दळवी , पो.ना. ०३-१४१० / प्रितम ढोरे , पो.ना. क्र . ०४-०७३३ / नितीन जाधव , पो . ना . क्र . ०६-१३८५ / हणमंत येडगे , पो . शि.क्र . ०८-१६३२ / महेश गायकवाड , पो . शि . क्र . ० ९ -०४८० / आकाश शेलार , म.पो.शि. ०७-१२४६ / अनुराधा टेकाळे व स . फौ.चा. क्र . २८५७ / राजेंद्र कदम , पो.ह.चा.क्र . ३३८४० / हनुमंत जाधव यांनी पार पाडली असून गुन्ह्याचा पुढील तपास मा . वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स . पो . नि . अमोल कदम हे करीत आहेत .

Comments (0)
Add Comment