चेंबूर परिसरात अनेक ठिकाणी उंट टेकड्यांवर नागरिक वस्त्या करून राहत आहेत. मुंबईतील अशा परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. रात्रीपासून मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उंच टेकड्यांवर राहणाऱ्या लोकांचा बळी गेला आहे. मात्र, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल असे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारकडून नियमाप्रमाणे मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली जाईल असेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- मुंबईत पावसाचा हाहाकार Live: मृतांच्या कुटुंबीयांना राज्याची ५ लाखांची, केंद्राची २ लाखांची मदत जाहीर
केवळ मुंबईतच नाही, तर जगातही काही देशांमध्ये अधिक पाऊस पडल्यास जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडत असतात. त्यांमुळे मुबईसारख्या दाट वस्तीच्या शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- मुंबईच्या पावसाने घेतला २२ जणांचा बळी, चेंबूर आणि विक्रोळीमध्ये मोठ्या दुर्घटना
चेंबूर परिसरातील नागरिकांना महापालिकेने नोटीस दिलेली नाही- नवाब मलिक
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी चेंबूर परिसरातील दुर्घटनाग्रस्त भागाला सकाळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी महापालिकेकडे बोट दाखवले. या परिसरातील नागरिक धोकादायक स्थितीत राहत असून देखील महानगरपालिकेने या नागरिकांना नोटीस बजावलेल्या नसल्याचे मलिक म्हणाले. चेंबूर परिसरात अनेक ठिकाणी उंच टेकड्यांवर, अथवा डोंगरांवर लोक अनेक वर्षांपासून राहत आहेत. येथील सह्याद्री नगर, पाजरपोळ परिसरात लोक मोठ्या प्रमाणात राहत असून येथे झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या अशा नागरिकांना कायम स्वरूपी स्थलांतरित करू अशी घोषणा मलिक यांनी केली. याबाबतचा प्रस्ताव आपण मांडणार असून लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल, असे मलिक म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का, नागपूरच्या निवासस्थानी ईडीचा छापा