‘मला मंत्रिपदावरून काढायचं असेल तर १५ ऑगस्टच्या दिवशी काढा’

हायलाइट्स:

  • के. सी. पाडवी यांचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा
  • मीडियातील चर्चेवर पाडवी यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया
  • मंत्रिपद काढायचंच असेल तर १५ ऑगस्टच्या दिवशी काढा – पाडवी

धुळे: राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडील मंत्रिपद काढून घेतलं जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्या संदर्भात खुद्द पाडवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझे मंत्रिपद काढूनच घ्यायचं असेल तर, ९ किंवा १५ ऑगस्ट रोजी काढा,’ असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. (K C Padvi on his Ministership)

साक्री तालुक्यात पाडवी यांच्या हस्ते खावटी कीटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांनी पाडवी यांना मंत्रिपदाविषयी प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर पाडवी यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत विरोधकांना सूचक इशारा दिला. मंत्रिपद जाणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘माझं मंत्रिपद काढून घेतलं जाणार असल्याची चर्चा मीडियामध्ये आहे. मला त्याविषयी काहीही माहिती नाही. वरिष्ठांशी मी याबाबत चर्चा केली. पण त्यांनाही याबाबत काहीही माहिती नाही,’ असं पाडवी म्हणाले. ‘मी चार वेळा मंत्रिपद नाकारलं आहे. तसंच एकदा पक्षाचं उपाध्यक्षपदही नाकारलेलं आहे. त्यामुळं अशा बातम्यांचं राग येत नाही आणि त्याबद्दल काही वाटतही नाही. पक्ष नेतृत्वाचा आदेश मी कायम मान्य केलेला आहे आणि यापुढंही पक्षाच्या आदेशानुसार काम करेन,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वाचा: अटकेच्या भीतीने अनिल देशमुख गायब; ‘ईडी’कडून शोधाशोध सुरू

‘खावटी अनुदान हे आदिवासींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून या योजनेचा लाभ आदिवासी बांधवांना दिला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ते म्हणाले. ‘महाविकास आघाडीचं सरकार उत्तम प्रकारे काम करत असून, आदिवासी कल्याणासाठी शक्य ते प्रयत्न करीत आहे,’ असा दावाही त्यांनी यावेळी केला.

वाचा: ‘पावसामुळं २५ लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडेनात, हात टेकले यांच्यासमोर’

Source link

DhuleK C Padvitribal affairs ministerआदिवासी विकास मंत्रीइंदिरा गांधीके. सी. पाडवीधुळेमहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment