Sindhudurg Weather : सिंधुदूर्गात पूराचा धोका वाढला, ‘या’ गावांना पाण्याचा वेढा

हायलाइट्स:

  • सिंधुदूर्गात पूराचा धोका वाढला
  • ‘या’ गावांना पाण्याचा वेढा
  • कणकवली गड नदीची पाण्याची पातळी वाढली

सिंधुदूर्ग : राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पातळी वाढलेली दिसत आहे. सिंधुदूर्गातही अशीच अवस्था आहे. कणकवली गड नदीची पाण्याची पातळी वाढल्याने नदी काठच्या गावांना पूराचा धोका आहे. यामुळे सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मसुरे, बादिवडे, खोतजूवा, बागायत, तेरे, भगवानगड या गावातील भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मसुरे बादिवडेमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मसुरे खोत जुवा बेटावर राहणाऱ्यां गावातील घरांना पाण्याचा वेढा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सगळ्यात गंभीर बाब म्हणजे सिंधुदूर्ग जिल्ह्यात पावसाचा वेग वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यावर पुराचं मोठं संकट आहे. तिकडे रत्नागिरीतही मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार खेड येथील जगबुडी नदीने व राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे नद्यांशेजारील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Weather Alert : मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांवर आस्मानी संकट, हवामान खात्याकडून पुन्हा रेड अलर्ट जारी
मिळालेल्या माहितीनुसार, जगबुडी नदीची इशारा पातळी ६ इतकी असून सध्याची पातळी ६.५० इतकी आहे. तर कोदवली नदीची इशारा पातळी ४.९० इतकी असून सध्याची पातली ६.०० इतकी आहे. अशात जर पाऊस आणखी वाढला तर परिसरात पूर येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Alert : मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांवर आस्मानी संकट

मुंबईत गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे मुंबईची दैना झाली असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशात आजही मुंबईसह अनेक जिल्ह्यांवर आस्मानी संकट असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सोमवारीही मुंबईत अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेत घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

आयएमडीने मुंबईत मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे तर उपनगरे आणि कोकण भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरातही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.Ratnagiri Weather : रत्नागिरीमध्ये चिंता वाढली! ‘या’ दोन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

Source link

flood in sindhudurgsindhudurg heavy rainsindhudurg rain news todaysindhudurg weathersindhudurg weather reportsindhudurg weather todaysindhudurg weather updateweather today at my location
Comments (0)
Add Comment