जळगांव जिल्हा विशेष प्रतिनिधी:- शैलेश चौधरी
एरंडोल:तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात सट्टा मटका हा व्यवसाय अगदी जोमाने चालत असून दिवसेंदिवस नवनवीन सट्टा-पेढ्या उदयास येत असल्याचे दिसून येते, अगदी किराणा दुकान असल्याचे जागोजागी बीटिंग घेणार्यांनी आपली दुकाने उघड्यावर व चौका चौकात थाटली आहेत,कोरोना काळात या मटका व्यवसायावर पोलीस प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने हा व्यवसाय अतिशय वेगाने वाढत आहे,गरीब मजूरवर्ग कमी वेळात जास्त पैसे मिळावे म्हणून लालसेपोटी मटका खेळण्यात व्यसनाधीन झाल्याचा दिसून येतो,सट्टा-मटका चालवणार्यांनी अतिशय धुमाकूळ घातला असून चिरी-मिरी देवाण घेवाण करून व्यवसाय चालविला जातो,अश्या प्रकारची कथा सट्टा बीट चालविणारे मोठया मनाने ग्राहकांना सांगून आकर्षित करतात.आमचा पी.के. व आम्ही नियमाप्रमाणे पोलिसांना सेक्शन(पैसे)भरतो म्हणून आमचे कोणीच काही करत नाही,अश्या प्रकारचा एकच सूर यांच्या गोटातून निघत असतो,काही दिवसांपुर्वी एका सट्टा मटका बीट धारकावर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती परंतू ती ही थातूरमातूर झाली की काय हा धंदा खुलेआम चालल्याने कष्टकरी व तरूण बर्बाद होत असल्याने याकडे जिल्हा व स्थानिक प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे,असा विषय सुजाण नागरीकांमधून चर्चिला जात आहे.