‘साखर कारखाने बळवण्याचे आघाडी सरकारचे षडयंत्र’; माजी मंत्र्यांचा आरोप

हायलाइट्स:

  • कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता, शिवसेनेने हिंदुत्व आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरोगामित्वाला तिलांजली देत सत्तेला चिकटून राहणेच पसंत केले आहे- माजी मंत्री लक्ष्ममराव ढोबळे.
  • सहकारी साखर कारखान्यांमागे चौकशांचा ससेमिरा लावून ते बळकावण्याचे षडयंत्र आघाडी सरकारने चालविले आहे- ढोबळे.
  • माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे पत्रकार परिषदेत आरोप.

म.टा.वृत्तसेवा, धुळे

कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता, शिवसेनेने हिंदुत्व आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरोगामित्वाला तिलांजली देत सत्तेला चिकटून राहणेच पसंत केले आहे. सहकारी साखर कारखान्यांमागे चौकशांचा ससेमिरा लावून ते बळकावण्याचे षडयंत्र आघाडी सरकारने चालविले आहे, असा घणाघाती आरोप माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. (former minister laxmanrao dhoble criticises maha vikas aghadi govt regarding sugar factories issue)

बहुजन रयत परिषदेच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवनिर्धार संवाद अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १८ जुलै ते ५ सप्टेंबरपर्यंत हे अभियान चालणार आहे. याअंतर्गत माजीमंत्री ढोबळे धुळे दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

क्लिक करा आणि वाचा- ‘मी सामना वाचत नाही’; राहुल गांधींच्या भेटीपूर्वी नाना पटोले यांचा टोला

यावेळी रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, महिला अध्यक्षा कोमल साळुंखे, प्रदेश महासचिव रविंद्र वाकळे उपस्थित होते. यावेळी ढोबळे यांनी केंद्रातील भाजपासह राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, राज्यात २४० साखर कारखाने असून केवळ ऊसामुळे आणि मनजर्मेटमुळे ४० कारखाने बंद आहेत. तर काही कारखान्यांवर जप्ती आणून, सील करुन शिखर बँकेच्या कर्ज नोटीसा काढून हुशार राज्यकर्त्यांनी हडप केले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- हृदयद्रावक! बाचणीत शॅाक लागून मायलेकरांचा मृत्यू, विद्युत तार तुटून अंगावर पडली

शिखर बँकेने आणि सरकारने संगनमत करून कारखाने विक्रीला काढून कचरा किंमतीने ठराविक नेत्यांनी विकत दिले आहेत. जेल मध्ये जाण्यापेक्षा चौकशा थांबवून सत्तेत जाणे अधिक चांगले अशी भुमिका तीनही पक्षांनी घेतली आहे. मागासवर्गीयांची ६ महामंडळे पुर्णपणे बंद आहेत. या मंडळांवर चेअरमन नियुक्त करण्यात एकमत होत नाही. महामंडळाच्या कारभारात साखर संघासारखी काळजी घेतली जात नाही. ऊसाची कमी रिकव्हरी दाखवून केंद्र सरकारची जी.एस.टी. चुकावायची आणि सारखेच्या गोडावूनमधून मागच्या दारातून शिक्का नसलेली पोती विकायची, असे उद्योग सुरु आहेत.

क्लिक करा आणि वाचा- बकरी ईदनिमित्त रामदास आठवले राज्य सरकारकडे करणार ‘ही’ मागणी

याकडे मात्र सरकार बघ्याची भुमिका घेत आहे. त्यामुळे राज्यांचे कोट्यावधी उत्पन्न आणि केंद्राचे लाखोतले उत्पन्न घटले असून गरीबांच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. मागासवर्गीयाचा विकास थांबला आहे. संजय निराधार योजना बंद पडली आहे. आश्रमशाळा वस्तीगृह, जि.प.च्या शाळांमध्ये चार-चार महिने पगार झाला नाही. शिक्षक कर्मचारी उपाशीपोटी सेवा देत आहेत. राष्ट्रीय पक्षाचा आव आणून कॉंग्रेसच्या अंगात येते. त्यामुळे प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षाची नक्कल करतात, असेही ढोबळे यांनी स्पष्ट केले.

Source link

Laxmanrao Dhobalemaha vikas aghadi govtआघाडी सरकारमाजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेसाखर कारखाने
Comments (0)
Add Comment