डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त एरंडोल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

एरंडोल:येथील न.पा.तर्फे महाराष्ट्र भुषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त एरंडोल नगरपालिका हद्दीतील कासोदा-भडगांव रोड लगतच्या स्मशानभुमीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी,सामाजिक कार्यकर्ते दशरथ चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी श्रीसदस्यांनी परिश्रम घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याप्रसंगी गर्दी न करता सामाजिक अंतर ठेवून मास्कचा वापर करण्यात आला.

Comments (0)
Add Comment