एरंडोल: एरंडोल व पारोळा तालुक्यातील खाजगी पशुचिकित्सक सेवादात्यांच्या विविध मागण्या मंजूर होत नसल्याने दि.१६ जुलै २०२१ पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले गेल्याने पशुपालकांचे कमालिचे हाल होत आहेत.
विशेषत: दुग्धोत्पादक शेतकर्यांच्या पशुंचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शासकीय पशुवैद्यकीय सेवेस खेड्या-पाड्यात मर्यादा पडतात,शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात नेणे शक्य होत नसल्याने पशुपालकांना खाजगी सेवादात्यांकडूनच आपल्या पशुंवर उपचार करून घेणे हाच एक उपाय असतांना या प्रश्नी जलद मार्ग निघावा अशी अपेक्षा पशुपालकांमधुन व्यक्त होत आहे.
नियत गावी व गोठ्यातच खाजगी पशुचिकित्सक सेवादात्यांकडून उपचार करवुन घेतल्यास वेळ वाचतो,काही ठिकाणी वेळीच उपचार न मिळाल्याने पशु दगावण्याच्याही घटना घडत आहेत तसेच लांबच्या अंतरावर असलेल्या शासकीय पशुवैद्यकीय केंद्रावर नेण्यास प्रचंड जिकीरीचे व बरोबरच गैरसोयीचे होत असल्याने पशुपालक हवालदील झाले आहेत.
पशुवैद्यक आयुक्तालयाच्या सन १९८४ च्या पशुवैद्यक कायद्यान्वये पदविकाधारक पशुधन पर्यवेक्षक,सेवक व सेवादात्यांवर खाजगी पशुचिकित्सा व उपचार करण्यास मर्यादा आल्या आहेत.