बोगस मतदान करणाऱ्यांना बसणार आळा;बुलढाणा जिल्ह्यात 39%मतदान ओळखपत्राला करण्यात आले आधारशी लिंक

बुलढाणा,दि.१३ : – बोगस मतदानाला आळा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून मतदान कार्डला आधार कार्डची जोड देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 39 टक्के आधार लिंकिंग झाले आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 20 लाख 35 हजार 778 मतदार आहेत.सर्व मतदारांच्या मतदान कार्डामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मतदान आणि आधार कार्ड याची ऑनलाइन लिंकिंग करण्यात येत आहे. मतदानातील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलेले आहे. एक मतदार दोन ठिकाणचे मतदान ओळखपत्र वापरत असेल, तर आधार कार्डच्या लिंकिंगमुळे या बोगस मतदारांवर चाप बसणार आहे.. तसेच यावेळी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांनी मतदारांना आपले मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याचे आवाहन केले आहे.

Comments (0)
Add Comment