स्वारगेट परिसरात जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्

पुणे,दि.१३:- पुणे शहरातील सोनिया गांधी नगर झोपडपट्टी , कैलास भवन ,स्वारगेट येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने  छापा टाकून १५ हजार ४९० रूपयेचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत १२ जणांवर गुन्हा  दाखल करण्यात आला असून १२ जणांना अटक  केली आहे . ही कारवाई  (दि. १२) रोजी सोनिया गांधी नगर झोपडपट्टी , कैलास भवन ,स्वारगेट एका मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये ५२ पत्त्यांचा पैशावर रमी हा जुगार पैशावर खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला समजली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून खेळणारे व खेळवणारे १२ जणांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात  महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत घटनास्थळावरुन जुगाराचे साहित्य असा एकूण १५ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई
सदरची कारवाई पोलीस आयुक्त , पुणे शहर , अमिताभ गुप्ता ,पोलीस सह आयुक्त , पुणे शहर संदिप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे , रामनाथ पोकळे ,पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली · सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विजय कुंभार तसेच पोउपनि श्रीधर खडके , पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत , बाबा कर्पे , अजय राणे , प्रमोद मोहिते , इरफान पठाण , पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे .

Comments (0)
Add Comment