Thane Rains Update: तुफान पावसामुळे कल्याणपुढे लोकल विस्कळीत; पाहा उंबरमाळी स्टेशनचं भीषण दृष्य

हायलाइट्स:

  • ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर अचानक वाढला.
  • उंबरमाळी स्टेशनवर पाण्याचा प्रचंड लोढा.
  • अंबरनाथ-बदलापूर दरम्यानही ट्रॅक पाण्याखाली.

ठाणे:ठाणे जिल्ह्यात तुफान पाऊस कोसळत असून उंबरमाळी आणि कसारा स्टेशन दरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने तसेच अंबरनाथ आणि वांगणी स्टेशन दरम्यानही ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने लोकलसेवा थांबवण्यात आली आहे. ( Heavy Rain In Thane Latest Update )

वाचा: दोन डोस घेतलेल्यांना लोकलमध्ये एंट्री?; अजितदादांच्या विधानानंतर दरेकर म्हणाले…

मध्य रेल्वेने १ वाजून १६ मिनिटांनी पावसाबाबत शेवटचे अपडेट्स दिले आहेत. त्यानुसार कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा या उपनगरील लोकल सेवेच्या दोन्ही मार्गांना फटका बसला आहे. या भागात मुसळधार पाऊस कोसळत असून त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. कसारा भागात अवघ्यात ४ तासांत १३९ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. उंबरमाळी स्टेशनवर प्लॅटफॉर्मवरून पाणी वाहत असल्याचे भीषण छायाचित्र हाती आले आहे. कसारा येथेही ट्रॅकवर पाणी भरले आहे. कसारा घाट येथे मोठा दगड ट्रॅकवर कोसळल्याचेही सांगण्यात येत आहे. या स्थितीत बुधवारी रात्री १०.१५ वाजल्यापासून इगतपुरी ते खर्डी दरम्यानची वाहतूक थांबवण्यात आली आहे. याचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसणार असून त्याबाबतची माहिती नंतर देण्यात येईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

वाचा: मुंबईत ‘त्या’ भयाण रात्री काय घडलं?; जाणून घ्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

अंबरनाथ, बदलापूर भागातही पावसाचा जोर वाढला असून अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. त्यामुळे रात्री १२.२० वाजतापासून वांगणी ते अंबरनाथ दरम्यानची वाहतूक थांबवण्यात आली, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने मुंबई महापालिकेची तानसा आणि मोडकसागर ही दोन्ही धरणं ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या असून धरणक्षेत्रात आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

वाचा: ठाण्यात डान्स बारवर कुणाचा वरदहस्त?; आणखी चौघे निलंबित

Source link

central railway local train service haltedheavy rain in thanekalyan karjat local train updatekalyan kasara local train updateMumbai Local Train Latest Updateअंबरनाथउंबरमाळीकसाराठाणेबदलापूर
Comments (0)
Add Comment