‘फडणवीस-पाटील ही जोडी ‘शकुनी डाव’ टाकल्याशिवाय राहणार नाही’

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री ठाकरे व पंतप्रधान मोदी यांची भेट
  • आमदार अमोल मिटकरी यांचा फडणवीस-पाटील जोडीवर निशाणा
  • फडणवीस-पाटील शकुनी डाव टाकतील – मिटकरी

अकोला: मराठा आरक्षणासह राज्याशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक शंका देखील उपस्थित केली आहे.

वाचा: चक्क काँग्रेस नेता म्हणाला, ‘मोदी है तो मुमकिन है’

मुख्यमंत्री ठाकरे व पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या अनुषंगानं मिटकरी यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘महाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान मोदी यांची भेट घेत असल्यानं चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र, कमालीची अस्वस्थ झालेली पाटील-फडणवीस ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशी भीती मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शंकेला आधार म्हणून मिटकरी यांनी दुसरं ट्वीट केलं आहे. त्यातून त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याकडं लक्ष वेधलं आहे. ‘मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या बैठकीला सुरुवात होण्याआधीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारवर बोलायला लागले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजप हा मानसिकदृष्ट्या थकलेला पक्ष झालाय. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा त्यांच्याकडं दुसरं काही शिल्लक नाही,’ असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.
वाचा: मोदींच्या भेटीआधी मुख्यमंत्र्यांची पवारांशी चर्चा; एकनाथ शिंदे म्हणाले…

वाचा: मामाला अडकविणाऱ्या भाच्याचे मामीने फोडले बिंग, बनाव उघड होताच…

Source link

Amol Mitkari Targets Fadnavis-Chandrakant PatilMaratha ReservationUddhav Thackeray-Narendra Modi Meetingअमोल मिटकरीउद्धव ठाकरे-नरेंद्र मोदी भेटचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसमराठा आरक्षण
Comments (0)
Add Comment