सावकाराच्या जाचाला कंटाळून पुण्यातील व्यावसायिक घाबरून घर सोडून गेला पळवून; सावकारावर गुन्हा दाखल

पुणे,दि.११:- पुण्यातील एका दुकानदाराने व्यवसायाकरीता व्याजाने पैसे घेतले असताना त्याच्या दुप्पटीहून अधिक रक्कम परत केली. तरीही आणखी पैशांची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे व्यावसायिक घरातून घाबरून पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पराग गायकवाड (वय 40, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) याच्याविरुद्ध खंडणी तसेच सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आंबेगाव येथे राहणार्‍या एका 27 वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अमोल ईचगे यांनी पराग गायकवाड याच्याकडून व्यवसायासाठी 10 टक्के व्याजाने अंदाज 8 लाख रुपये फेब्रुवारी 2017 मध्ये घेतले होते. त्यांनी ठरल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला व्याजा पोटी आतापर्यंत 19 लाख रुपये परत केली.
असे असतानाही गायकवाड याने आणखी 15 लाख रुपयांची शिल्लक आहे ते आशी मागणी केली.
गायकवाड याने फिर्यादीचे आई वडिल व पतीस जीवे मारण्याची धमकी दिली. ‘‘तुम्ही दोघांनी मला खूप त्रास दिलेला आहे. तुमच्याकडून मला माझे व्याजाचे ९ लाख रुपये इतकी रक्कम येणे बाकी आहे. परंतु, तुम्ही मला वेळेवर रक्कम दिली नाही, त्यामुळे तुम्हाला आता मला १५ लाख रुपये द्यावे लागतील. रक्कम दिली नाही तर मी तुम्हाला जीवंत सोडणार नाही,’’ अशी धमकी दिली. त्याच्या धमकीमुळे अमोल ईचगे हे घाबरुन ८ ऑक्टोबरला घरातून घाबरून पळून गेले आहे. पोलीस उपनिरीक्षक गुप्ता अधिक तपास करीत आहेत

Comments (0)
Add Comment