प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते. सकाळी स्नानादी कार्ये उरकल्यानंतर एका चौरंगावर गणपतीची स्थापना करावी. गणपतीची षोडशोपचार पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखावावा. दिवसभर उपास केल्यानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे. चंद्रदर्शन हा या व्रतातील महत्त्वाचा भाग आहे.
दिवाळीच्या साफ सफाई पासून ते लक्ष्मी स्थापनेपर्यंत, या वास्तू टिप्स लक्षात ठेवून करा काम
संकष्ट चतुर्थी : गुरुवार, १३ ऑक्टोबर २०२२
– निज अश्विन वद्य चतुर्थी प्रारंभ : १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजून ३७ मिनिटे.
– निज अश्विन वद्य चतुर्थी समाप्ती : १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजून २५ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे निज अश्विन वद्य संकष्ट चतुर्थी व्रत गुरुवार, १३ ऑक्टोबर २०२२ रोजी करावे, असे सांगितले जात आहे. नोव्हेंबर महिन्यातील संकष्ट चतुर्थीला सर्वार्थ सिद्धि नामक योग जुळून येत आहे. हा योग मनोकामना पूर्ण करणारा मानला गेला आहे. तसेच बुधवारी करण्यात येणारे गणेश पूजन विशेष मानले जाते. या दोन्ही शुभ योगावर केलेल्या व्रताचरणामुळे मनोकामना पूर्णत्वास जाऊ शकतात, असे सांगितले जाते.
चंद्रोदय वेळ :
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०८ वाजून ४३ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०८ वाजून ३९ मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ ०८ वाजून ३७ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०८ वाजून ३० मिनिटे |
वर्धा | रात्रौ ०८ वाजून १८ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०८ वाजून २१ मिनिटे |
बीड | रात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे |
सांगली | रात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे |
गोंदिया | रात्रौ ०८ वाजून १५ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०८ वाजून ३५ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०८ वाजून १५ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०८ वाजून २१ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०८ वाजून २५ मिनिटे |
औरंगाबाद | रात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०८ वाजून ३० मिनिटे |
परभणी | रात्रौ ०८ वाजून २९ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०८ वाजून २६ मिनिटे |
उस्मानाबाद | रात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०८ वाजून १३ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०८ वाजून १३ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०८ वाजून २९ मिनिटे |
जालना | रात्रौ ०८ वाजून ३१ मिनिटे |
ओझर | रात्रौ ०८ वाजून ३७ मिनिटे |
लातूर | रात्रौ ०८ वाजून ३१ मिनिटे |
वाशिम | रात्रौ ०८ वाजून २३ मिनिटे |
सिंधुदुर्ग | रात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे |
मंगळ ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश : आर्थिक आणि आरोग्याची घ्या खास काळजी, ‘या’ राशीला येईल अडचण