दिवाळी वास्तू टिप्स, साफ सफाई पासून ते लक्ष्मी स्थापनेपर्यंत करा ‘या’ गोष्टी

अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजचे वसुबारस ते कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजचे भाऊबीज या कालावधीत दीपोत्सव साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. यंदा २१ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दिवाळीचे पर्व साजरे केले जाईल. दिवाळी सणालाही काही वास्तू टिप्स लक्षात ठेवाव्या, यंदा दिवाळीची साफसफाई सुरू करण्याआधी या गोष्टीची काळजी घ्या.

दिवाळीची साफ सफाई

प्रत्येक सणाला आपण घराची स्वच्छता करतो. वास्तुशास्त्रानुसार स्वच्छता घरातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करते. खराब वस्तू, जुने कपडे, तुटलेली भांडी, जुनी आणि साचलेली घाण,आता तुम्हाला काही उपयोग नाही अशा वस्तू घरातून काढून टाकाव्या. घरात किंवा कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टींसाठी जागा करा. दिवाळीच्या आधी घराची स्वच्छता करताना घराची साफसफाई करताना कुठेही कचरा राहणार नाही याची दक्षता ठेवा. यासोबतच घरातील देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो यांचे दिवाळीच्या पूजेपूर्वी विसर्जन करावे. घराच्या ईशान्य कोपऱ्यात कोणतीही धारदार किंवा तुटलेली वस्तू ठेवू नका. घरात कोणतेही हिंसक प्राणी किंवा नकारात्मक फोटो असतील तर ते काढून टाका. संपूर्ण साफ सफाई झाल्यावर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे मीठ मिसळून घरभर शिंपडा. मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरातून काढून टाकते.

पूजेसाठी योग्य दिशा

दिवाळीची पूजा सहसा संध्याकाळी केली जाते आणि वास्तुशास्त्रात पूजेची योग्य दिशा असणे महत्त्वाचे आहे, कारण याचा घरातील लोकांच्या भविष्यावर परिणाम होतो. देवांचे स्थान मानल्या जाणाऱ्या घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात पूजा करावी. जर या दिशेला पूजा करता येत नसेल तर दिवाळीची पूजा घराच्या आग्नेय भागातही करता येते. ती दिशा अग्निदेवाची दिशा मानली जाते. नेहमी पूर्व दिशेला तोंड करून पूजा करणे चांगले मानले जाते.

​पूजेचे स्थान

वास्तूनुसार दिवाळीत तुम्ही लाल, हिरवा, केशरी, जांभळा, क्रिम आणि पिवळ्या रंगांनी पूजास्थळ सजवू शकतात. पूजेच्या ठिकाणी स्वस्तिकाची रांगोळी काढणे खूप शुभ मानले जाते. दिवाळीच्या पूजेच्या वेळी धन आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीचे रांगोळी काढून स्वागत करावे कारण स्वस्तिकाचे प्रतीक हे देवी लक्ष्मीचे आवडते प्रतीक मानले जाते.

घरातील तिजोरी

तिजोरी अशी असावी की, ज्यामुळे धनलाभ होईल आणि येणारे धन थांबणार नाही. ज्योतिषांच्या मते, दिवाळीच्या दिवशी तिजोरी उत्तरेकडे तोंड करून ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा वर्षभर राहते. तिजोरीच्या दारावर उत्तरेकडे तोंड करून स्वस्तिकचे शुभ चिन्ह बनवा. खुणा करण्यासाठी तेल आणि हळद वापरा.

लक्ष्मी मुर्ती अशी असावी

दिवाळीच्या पूजेच्या वेळी लक्ष्मी आणि गणेश यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तेव्हा लक्षात ठेवा की या मूर्ती मातीच्याच असाव्यात. लक्ष्मीची मूर्ती लाल, केशरी किंवा गुलाबी रंगाच्या कपड्यांनी सजलेली असावी आणि चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे. देवी लक्ष्मी आशीर्वादाच्या मुद्रेत असेल अशी मूर्ती नेहमी ठेवावी. वास्तूनुसार गणपतीची अशी मूर्ती आणावी ज्यामध्ये त्याची सोंड डावीकडे असेल.

दिव्यांची दिशा आणि रंग

पुरेशा प्रकाशासह प्रत्येक कोपऱ्यात रंगीत मातीचे दिवे लावून नकारात्मक ऊर्जा काढून टाका. बाजारात सर्व आकाराचे आणि सर्व प्रकारचे दिवे मिळतात चिकणमाती किंवा इतर धातू (पितळ/चांदी/मिश्रधातू) उपलब्ध असताना, वास्तुच्या प्राचीन शास्त्रानुसार मातीचे दिवे सर्वात योग्य आहेत. याशिवाय तिळाचे तेल किंवा तूप हे या दिव्यांसाठी सर्वोत्तम इंधन आहे. प्रवेशद्वार चांगले प्रज्वलित असले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक अखंड दिवा रात्रभर प्रज्वलित केला पाहिजे. दिवे लावताना दिशा आणि रंग असा वापरावा, जर तुम्ही उत्तरेला निळा मातीचा दिवा वापरला तर पूर्वेला हिरवा, आग्नेयेला नारिंगी, दक्षिणेला लाल, नैऋत्येला गुलाबी किंवा राखाडी, पश्चिमेला गडद निळा आणि वायव्येला निळा किंवा राखाडी रंग हे योग्य रंग आहेत आणि ते तुमच्या परिसरात आणि आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. तसेच, घरात ११, २१, ३१, ४१ याच संख्यांमध्ये दिवे लावावे असे मानले जाते.

Source link

dipavalidiwali 2022Diwali Vastu remedyDiwali Vastu TipsVastu Tipsदिपावली 2022दिवाळीदिवाळी वास्तू टिप्सवास्तू उपायवास्तू टिप्स
Comments (0)
Add Comment