Diwali 2022: सूर्यग्रहणाच्या छायेत राहील दिवाळीचा सण, विलक्षण योगायोग आणि सुतक काळ

यंदा सोमवार २४ ऑक्टोबरला दिवाळी साजरी होणार आहे. पण दिवाळीवर सूर्यग्रहणाची छाया असल्याने यंदाची दिवाळी खूप खास असणार आहे. वास्तविक, सूर्यग्रहण नेहमीच अमावस्या तिथीला होते आणि दिवाळीही अमावस्या तिथीला होते. यंदा दिवाळीत असा योगायोग घडला आहे की, दिवाळीच्या रात्रीपासूनच सूर्यग्रहणाचे सुतक सुरू होणार आहे. मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी वर्षातील दुसरे सूर्यग्रहण होणार असून, यावर्षी भारतात दिसणार्‍या पहिल्या सूर्यग्रहणाच्या खास गोष्टी जाणून घेऊया.

आजचे पंचांग ०६ ऑक्टोंबर २०२२ : पापांकुशा एकादशी व्रत, आजचा शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घ्या

सूर्यग्रहणाचा मोक्ष भारतात दिसणार नाही

मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण सुमारे ०४ तास ०३ मिनिटांचे असेल. आणि या ग्रहणाचा मोक्ष भारतात दिसणार नाही कारण सूर्यग्रहण संपण्यापूर्वीच सूर्यास्त होईल.

सुतक सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी

मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ०२ वाजून २९ मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू होत आहे. सूर्यग्रहणाबाबत एक नियम आहे की त्याचे सुतक ग्रहण सुरू होण्यापूर्वी १२ तास आधी लागते. त्यामुळे २४ ऑक्टोबर दिवाळीच्या रात्री ०२ वाजून ३० मिनिटांनी सूर्यग्रहणाचे सुतक सुरू होणार आहे.

Dhanteras 2022 : धनतेरस ‘या’ शुभ योगात, यावर्षी दोन दिवस होईल धनलक्ष्मीचा लाभ

दिवाळीच्या रात्री महानशीठ काळ

दिवाळीची रात्र दिव्यांनी झगमगेल आणि सूर्यग्रहणाचा दिवाळी सणावर कुठलाही अशुभ परिणाम होणार नाही. दिवाळीची रात्र साधनेसाठी अतिशय चांगली मानली जाते. यावेळी देवी कालीची पूजा, तंत्र साधना केली जाते. महानशीठ काळची वेळ सोमवार २४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून ५५ मिनिटे ते मंगळवार २५ ऑक्टोबर दुपारी ०१ वाजून ५३ मिनिटापर्यंत असेल. दिवाळीच्या रात्री ग्रहणाच्या सुतकामुळे ही रात्र तंत्र साधना आणि सिद्धीसाठी खूप खास असेल. या रात्री जागरण केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप केल्यास खूप फायदा होईल.

पं.राकेश झा

Dhanteras Saturn Transit : धनत्रयोदशीच्या दिवशी शनीच्या बदलत्या चालीमुळे ‘या’ ५ राशी होणार मालामाल

Source link

diwali 2022Diwali And Solar Eclipse 2022diwali auspicious yogadiwali solar eclipse significance in marathisolar eclipse sutak timeदिवाळीदिवाळी 2022भारतात दिसणारे सूर्यग्रहणसूर्यग्रहणसूर्यग्रहणाचा सुतक काळ
Comments (0)
Add Comment