वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ते भाऊबीजेपर्यंत… तिथी योग मुहूर्त सर्वकाही

सन २०२२ मधील दीपोत्सवाला अवघे काही दिवस राहिले आहेत. ऑक्टोबर महिन्यात मध्यावर दिवाळी सण साजरा करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी दिवाळीचा फराळ, दिवाळीचे कार्यक्रम, दिवाळीची खरेदी यांच्या योजनांना सुरुवातही झालेली आहे. साधारणपणे वसुबारसपासून ते यमद्वितीय म्हणजेच भाऊबीजपर्यंत दीपोत्सव साजरा केला जातो. शास्त्रांनुसार, अश्विन अमावास्येला लक्ष्मी देवीच्या पूजनासह गणपती आणि कुबेराची पूजा करावी, असे सांगितले जाते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज नेमके कधी आहेत? ते कोणत्या दिवशी साजरे केले जातील? पाहूया…

शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय या दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावेत, असे म्हटले जाते. चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, तो याच दिवसात. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो, अशी मान्यता आहे.

Diwali 2022: सूर्यग्रहणाच्या छायेत राहील दिवाळीचा सण, विलक्षण योगायोग आणि सुतक काळ

सन २०२२ मधील दिवाळी

– वसुबारस : निज अश्विन कृष्ण एकादशी – शुक्रवार, २१ ऑक्टोबर २०२२.

– धनत्रयोदशी : निज अश्विन कृष्ण द्वादशी- शनिवार, २२ ऑक्टोबर २०२२.

– नरक चतुर्दशी : निज अश्विन कृष्ण चतुर्दशी – सोमवार, २४ ऑक्टोबर २०२२.

– लक्ष्मीपूजन : निज अश्विन अमावास्या – सोमवार, २४ ऑक्टोबर २०२२.

– बलिप्रतिपदा/पाडवा,वहीपूजन : कार्तिक शुद्ध प्रतिपदा – बुधवार, २६ ऑक्टोबर २०२२.

– भाऊबीज : कार्तिक शुद्ध प्रतिपदा- बुधवार, २६ ऑक्टोबर २०२२.

चतुर्दशी आणि अमावस्या यांचा योग

यावेळी दिवाळी आणि छोटी दिवाळी हा सण एकत्र साजरा केला जाणार आहे. साधारणपणे छोटी दिवाळी दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजेच अश्विन कृष्ण चतुर्दशीला साजरी केली जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अश्विन कृष्ण अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. मात्र यंदा चतुर्दशी आणि अमावस्या या दोन्ही सणांचा असा योग आला आहे, त्यामुळे हे दोन्ही सण एकाच दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबरला साजरे केले जाणार आहेत. तर यावेळी २२ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी पडणार आहे.

Diwali 2022 : दिवाळीत ‘या’ राशींसाठी सोने-चांदी खरेदी करणे ठरेल फायदेशीर

दिवाळी तिथी मुहूर्त

या वर्षी अश्विन कृष्ण चतुर्दशी तिथी २३ ऑक्टोबरला संध्याकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होते आणि २४ ऑक्टोबरला संध्याकाळी ०५ वाजून २८ मिनिटांनी संपते. त्यानंतर २४ रोजी सायंकाळी ०५ वाजून २८ वाजल्यापासून अमावस्या तिथी सुरू होत असून ती २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०४ वाजून १९ मिनिटापर्यंत राहील. २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी म्हणजे प्रदोष कालावधीपूर्वी अमावस्या समाप्त होत आहे. त्यामुळे दिवाळीचा सण या दिवशी साजरा केला जाणार नसून एक दिवस आधी साजरा केला जाईल.

वास्तविक, दिवाळीचा नियम असा आहे की, ज्या दिवशी संध्याकाळी आणि मध्यरात्री अमावस्या असते, त्याच दिवशी दिवाळीचा सण साजरा केला जातो. या नियमामुळे २४ ऑक्टोबरला दिवाळी असणार आहे. दुसरीकडे २५ तारखेला अमावस्या असल्याने अमावास्येशी संबंधित पूजा २५ तारखेला होणार आहे. तर २५ ऑक्टोबरला सूर्यग्रहण देखील असणार आहे.

चतुर्दशी तिथी २३ ऑक्टोबरलाच संध्याकाळी ०६ वाजून ०४ वाजता सुरू होत आहे, जी दुसऱ्या दिवशी २४ ऑक्टोबरला संध्याकाळी ०५ वाजून २८ मिनिटांनी संपेल. अशा स्थितीत छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशी हा सण २४ ऑक्टोबर रोजी उदय तिथीला साजरा केला जाणार आहे.

Diwali 2022 : दिवाळीपूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या मग साजरी करा महादीपावली, लक्ष्मीमाता होईल प्रसन्न

Source link

deepavalidhanterasdiwali 2022lakshmi pujan and bhaubeej 2022narak chaturdashi 2022solar eclipse october 2022दिवाळीदिवाळी पाडवाधनतेरस
Comments (0)
Add Comment