या उपायाने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल
सोमवार २४ ऑक्टोबर रोजी दिवाळीचा सण असून, त्यापूर्वी दोन शुक्रवार मधोमध पडत आहेत. या शुक्रवारी तुम्ही दीड किलो जव घ्या आणि झोपण्यापूर्वी डोक्याजवळ ठेवा. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी गायीला चारा खाऊ घाला. असे केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता निर्माण होते.
दररोज याचे पाठ करा
दिवाळीच्या सणाला महापर्व म्हणतात आणि या शुभ दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आतापासून दिवाळीपर्यंत दररोज कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. कनकधारा स्तोत्राचे पठण केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि दीपावलीच्या दिवशी जेव्हा तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा कराल तेव्हा ती स्वतः उपस्थित असेल. आदि शंकराचार्यांनी कनकधारा स्तोत्राच्या पठणाने सोन्याचा पाऊस पाडला होता असे म्हणतात, हा ग्रंथ अत्यंत चमत्कारिक आणि लाभदायक मानला जातो.
Diwali 2022 : दिवाळीत ‘या’ राशींसाठी सोने-चांदी खरेदी करणे ठरेल फायदेशीर
धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय करा
कुटुंब सुखी, समृद्ध आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी व्रत ठेवा. व्रतामध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला मोगरा आणि गुलाबाचे अत्तर अर्पण करा. असे मानले जाते की, असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते, ज्यामुळे वैवाहिक जीवन आणि कामाच्या ठिकाणी लाभ होतो.
दर शुक्रवारी हा उपाय करा
जर तुम्हाला आयुष्यात नेहमी प्रगती हवी असेल आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद हवा असेल तर दर शुक्रवारी घराजवळील विहिरीत कच्चे दूध टाका. असे मानले जाते की असे केल्याने प्रगतीसोबतच संपत्तीही वाढते. यासोबतच कुंडलीत स्थान असलेल्या ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. त्याचे फायदे तुम्हाला दिवाळीपर्यंत पाहायला मिळतील.
अशी गणेश-लक्ष्मीची मूर्ती घरी आणा
देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी स्फटिकाची गणेश-लक्ष्मी मुर्ती घरी आणा आणि नियमित पूजा सुरू करा. तसेच या मूर्तींची पूजा धनत्रयोदशी आणि दिवाळीला केल्यास खूप शुभफळ प्राप्त होतात. गणेश-लक्ष्मीची पूजा केल्याने धनाशी संबंधित समस्या हळूहळू दूर होतात आणि कर्जातूनही मुक्ती मिळते. तसेच काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर गणेश-लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श केल्यास ते कामही पूर्ण होईल.
दिवाळीच्या साफ सफाई पासून ते लक्ष्मी स्थापनेपर्यंत, या वास्तू टिप्स लक्षात ठेवून करा काम
लक्ष्मीपूजनात हा उपाय करा
घरामध्ये देवी लक्ष्मी सदैव राहावी, अशी इच्छा असेल तर दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनात ११ कवड्यांना हळदी कुंकू लावा आणि नंतर मातेच्या चरणी अर्पण करून पूजा करा. दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात ठेवून तिजोरीत किंवा कपाटात ठेवावीत. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि धन-समृद्धीचे योग तयार होऊ लागतात.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.