नरक चतुर्दशी-लक्ष्मी पूजन एकाच दिवशी, अभ्यंगस्नानासोबत ‘या’ गोष्टी केलात तर दिवाळीत व्हाल मालामाल

यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन एकाच दिवशी आहे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी म्हणतात. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सण साजरा केला जातो म्हणून याला नरक चौदस, रूप चतुर्दशी आणि छोटी दिवाळी असेही म्हणतात. यावेळी २४ ऑक्टोबर सोमवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन आहे. या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दक्षिण दिशेला यम नावाचा दिवाही लावला जातो. धार्मिक ग्रंथानुसार छोटी दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला होता. ज्योतिष शास्त्रामध्ये या दिवसाचे महत्व सांगून काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत, हे उपाय केल्याने जीवनात धन समृद्धी तर येतेच पण भय सोबतच पाप-दुःखापासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया या उपायांबद्दल…

​या दिशेला करा पूजा

छोटी दिवाळीच्या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते म्हणून या दिवसाला यम असेही म्हणतात. या दिवशी घरात सर्वत्र दिवा लावावा. यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहून प्रार्थना करा. असे केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो.

Diwali 2022 : दिवाळीत ‘या’ राशींसाठी सोने-चांदी खरेदी करणे ठरेल फायदेशीर

​यांचे पूजन करा

नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध करून मोक्ष दिला होता, म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. यासोबतच गायींची सेवा करून त्यांना हिरवा चारा खायला द्या आणि आशीर्वाद घ्या. असे केल्याने धन-समृद्धी आणि देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात.

​दूर होईल नकारात्मक शक्ती

नरक चतुर्दशीच्या दिवशी यमाचा दिवा लावला जातो. असा समज आहे की यमाच्या नावाने मोठा दिवा लावावा आणि तो संपूर्ण घरात फिरवावा त्यानंतर घरापासून दूर कुठेतरी नेऊन ठेवावा. असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो.

Diwali 2022: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ते भाऊबीजेपर्यंत… तिथी योग मुहूर्त सर्वकाही जाणून घ्या

​घरात राहील सुख शांती

लहान दिवाळीच्या दिवशी सर्व देवतांची पूजा करावी आणि त्यांच्यासोबत पितरांच्या नावाने दिवा लावावा. असे केल्याने दिव्याचा प्रकाश पितरांपर्यंत पोहोचतो आणि ते प्रसन्न होतात असे मानले जाते. पितरांच्या प्रसन्नतेमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते.

​याठिकाणी नक्की दिवा लावा

छोटी दिवाळीच्या दिवशी सर्व देवतांची पूजा केल्यानंतर संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तेलाचे दिवे लावावेत. असे केल्याने घरात लक्ष्मी वास करते. तसेच या दिवशी काली मातेचीही पूजा करावी. बंगालमध्ये नरक चतुर्दशीचा दिवस कालीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. नरक चतुर्दशीला तिथे कालीचौदस म्हणतात.

Diwali 2022 : दिवाळीपूर्वी या गोष्टी जाणून घ्या मग साजरी करा महादीपावली, होईल लक्ष्मी प्रसन्न

​यामुळे होईल सौंदर्य प्राप्ती

नरक चतुर्दशीला रूप चतुर्दशी असेही म्हणतात, म्हणून या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून तिळाच्या तेलाने शरीराला मालिश करावी आणि चिरचिरीची पाने पाण्यात टाकून स्नान करावे. हे जमत नसल्यास उटणे लावून आंघोळ करावी. यानंतर घराजवळील विष्णू किंवा कृष्ण मंदिरात पूजा करावी. असे केल्याने नरकाच्या भयापासून मुक्ती मिळते आणि सौंदर्याची प्राप्ती होते.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

diwali 2022diwali remedieslakshmi kuber pujan 2022narak chaturdashi 2022wealth and prosperity on diwaliदिपावलीदिवाळीनरक चतुर्दशीलक्ष्मी कुबेर पूजन
Comments (0)
Add Comment