पुण्यातील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह कर्म

पुणे,दि.२१;- झुंजार ऑनलाइन –पुणे शहर कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी 50 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षदा बाळासाहेब दगडे असे महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्यासह पोलिस कर्मचारी अभिजीत विठ्ठल पालके यांच्यावर 50 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबियावर दाखल असलेल्या गुन्हयाच्या चार्जशीटमध्ये मदत करण्यासाठी तसेच तक्रारदार (फिर्यादी) यांच्या आई-वडिल आणि बहिणीला अटक न करण्यासाठी पोलिस कर्मचारी पालके यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षदा दगडे यांच्यासाठी तडजोडीअंती 50 हजार रूपयाची मागणी केली. त्यास एपीआय दगडे यांनी लाच मागण्यासाठी मदत केली. त्यामुळे अ‍ॅन्टी करप्शनकडून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विजयमाला पवार, पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर ,
कर्मचारी वैभव गोसावी, रियाज शेख, पूजा डेरे, चालक दीपक दिवेकर, पांडुरंग माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली
आहे.

Comments (0)
Add Comment