Dhanteras 2022 : धनत्रयोदशीच्या आपल्या नातेवाईकांना ‘या’ शुभेच्छा देऊन उत्साह द्विगुणित करा

दर वर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी धनत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा धनत्रयोदशीच्या दुसर्‍या दिवशी दिवाळी साजरी होत आहे. शास्त्रानुसार या दिवशी भगवान धन्वंतरीचा जन्म झाला होता. यासाठी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते, त्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची प्रथा आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करण्याची परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या मित्र मैत्रीणी आप्तेस्वकीयांना आणि नातेवाईकांना मराठीतून शुभेच्छा द्या.

“धन धान्याची व्हावी
घरीदारी रास
राहो सदैव लक्ष्मीचा
तुमच्या घरी वास
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा खास”

“धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो
ही ईश्वर चरणी प्रार्थना,
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”

Dhanteras 2022 धनत्रयोदशी : पूजा मुहूर्त आणि शुभ योग, सुख-समृद्धीसाठी यावेळेत करा धनतेरसची पूजा

“दिव्यांची रोषणाई
फराळाचा गोडवा
अनोखी अपूर्वाई
अन् धनत्रयोदशीचा सोहळा!
सर्वांना धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!”

“आला आला दिवाळीचा सण
घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!”

“धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु
अमृतमयी मंगलमय हो
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”

“धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!”

“कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो.
दीपावली निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो.
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!”

Diwali 2022 दिवाळी : वार्षीक राशीभविष्य, मिथुन सहीत ‘या’ राशीवर वर्षभर राहील लक्ष्मीकृपा

“धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी
कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी
फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”

“दिवाळीत लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
धनत्रयोदशी घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा,
धनत्रयोदशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा”

Dhanteras Muhurta: धनतेरसला सोने चांदी आणि वाहन खरेदी करण्याचा विचार करताय, तर जाणून घ्या अचुक मुहूर्त

Source link

dhanteras greetingsdhanteras messagesdhanteras whatsapp facebook massagesdhanteras wishes in marathidhantrayodashiधनतेरसधनतेरसच्या शुभेच्छाधनत्रयोदशीधन्वंतरी पूजन
Comments (0)
Add Comment