Bhaubeej 2022 Wishes: यंदा भाऊबीजेला आपल्या भाऊबहिणीला ‘या’ शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणीत करा

आज बुधवार २६ ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी केली जाईल. भाऊबीजेचा सण हा यम द्वितिया म्हणून देखील ओळखला जाते. भावाला दीर्घायुष्य मिळावं या इच्छेसह बहिणी या दिवशी यम राजाची पूजा करतात. त्याच्या पाशातून आपला भाऊ सुरक्षित राहावा अशी त्यामागील श्रद्धा आहे. अगदीच भाऊ नसल्यास काही मुली चंद्राला आपला भाऊ मानून त्याला ओवाळून पूजा देखील करतात. भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला साजरा केला जातो. भाऊबीज हा सण दरवर्षी दिवाळीच्या दोन दिवसांनी साजरा केला जातो. यावर्षी भाऊबीज २६ ऑक्टोबर रोजी बुधवारी साजरी केली जात आहे. भाऊबीजेला बहिण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्या बदल्या भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. भाऊ आणि बहिणीस शुभेच्छा देण्यासाठी भाऊबीज शुभेच्छा संदेश.

दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

आली आज भाऊबीज
ओवाळते भाऊराया
राहू दे रे नात्यामध्ये
स्नेह, आपुलकी माया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा

पवित्र नाते
बहिण भावाचे,
लखलखते राहू दे,
दीप जिव्हाळ्याचे..!!
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा

भाऊबीज २०२२: ‘या’ शुभ मुहुर्तावर करा औक्षण, जाणून घ्या महत्व आणि मान्यता

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात
सण पवित्र नात्याचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

“दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा…!!!”

रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे भाऊबीजेचा पवित्र सण

Vastu Tips झाडूला चुकूनही पाय लागला तर दिवाळीत या गोष्टी केल्याने होईल त्वरित फायदा, लक्ष्मी कृपाही लाभेल

Source link

bhai dooj wishesbhaubeej greetingsbhaubeej whatsapp facebook messagesbhaubeej wishes in marathihappy bhaubeejHappy Bhaubeej 2022भाऊबीजभाऊबीज शुभेच्छा संदेशभाऊबीज शुभेच्छा संदेश मराठीतयमद्वितिया
Comments (0)
Add Comment