Chandra Grahan in Maharashtra Mumbai Time : सूर्य आणि चंद्र ह्यांचे मध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते. आज मंगळवार ८ नोव्हेंबर २०२२ ला दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती वाजता दिसेल, त्याचा मोक्ष काळ सर्वकाही जाणून घेऊया.
ग्रहणाचा छायाकल्प काळ २.१४ तास खंडग्रास काळ २.१५ तास खग्रास काळ १.२५ तास तर एकूण ग्रहणाचा काळ ५.५४ तास असेल. भारतातून चंद्रोदया सोबतच ग्रहण लागलेले असेल आणि ०७.२६ वाजता ग्रहण संपेल. पूर्व भारतात मोठे ग्रहण दिसेल तर पूर्व – पश्चिम रेखांशा नुसार ग्रहण (ग्रस्तोदित भाग ) लहान होत जाईल. सूर्य आणि चंद्र ह्यांचे मध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते. ह्यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. गडद छायेत पूर्ण चंद्र आल्यास खग्रास, काही भाग आल्यास खंडग्रास तर उप् छायेत चंद्र आल्यास छांयाकल्प चंद्रग्रहण होते. दरवर्षी दोन तरी चंद्रग्रहणे होतात.
महाराष्ट्रातील शहरे आणि चंद्रग्रहण वेळ
मुंबई ०६.०१ ते ०६.१८
औरंगाबाद ०५.४९ ते ०६.१८
ठाणे ०६.०१ ते ०६.१८
पुणे ०५.५८ ते ०६.१८
नाशिक ०५.५६ ते ०६.१८
नागपूर ०५.३२ ते ०६.१८
जळगाव ०५.४७ ते ०६.१८
२०२३ मध्ये होणारे ग्रहण
२०२३ मध्ये एकूण चार ग्रहणे होणार आहेत. त्यात २०/४/२०२३ रोजी खग्रास सूर्यग्रहण, ५/६ मे २०२३ रोजी छायाकल्प चंद्रग्रहण, १४/१०/२३ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आणि शेवटी २८, २९ ऑक्टोबर २०२३ रोजी खंडग्रास चंद्रग्रहनांचा समावेश आहे. पृथ्वीवरची दररोजची रात्र हा सुद्धा एक सावलीचाच प्रकार असून अशी ग्रहणे सूर्यमालेत सतत होत असतात.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.