‘या’ गोष्टी बाथरुममध्ये असतील तर आताच काढून टाका, वास्तुदोषाला ठरतात कारण

Vastu Dosh Nivaran: वास्तूनुसार घरातील प्रत्येक जागा महत्त्वाची असते आणि त्याबाबत काही नियम असतात. त्याचप्रमाणे बाथरूमलाही वास्तूमध्ये विशेष स्थान आहे. ज्योतिषशास्त्रात याचा संबंध चंद्र आणि वरुण या देवतांशी असल्याचे मानले जाते. वास्तू आणि धर्म या दोन्हीमध्ये असे मानले जाते की, जर तुमच्या घरातील स्नानगृह अस्वच्छ राहिले तर अशा घरापासून धन, संपत्ती आणि समृद्धी दूर राहते. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की, बाथरूममध्ये जर वास्‍तुदोष असेल तर तो दूर कसा करावा.

फोटो आणि या गोष्टींचा वापर

फोटो

तुमची आंघोळीची जागा, म्हणजे बाथरूममध्ये चुकूनही फोटो लावू नये. फोटो लावल्यावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि दोष वाढतो.

उपकरणांचा वापर

काही लोक बाथ टबमध्ये किंवा टॉयलेट सीटवर बसून फोन वापरतात असे अनेकदा दिसून येते. तुम्हीही असे करत असाल तर लगेच थांबा. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि यंत्रे शनी आणि राहूशी संबंधित आहेत. त्यांचा बाथरूममध्ये वापर केल्यास शनी आणि राहूचा दोष जाणवतो.

स्वच्छता आणि चप्पल

असे करू नका

बाथरूममध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घ्या आणि बादली आणि मग चुकूनही घाण राहू देऊ नये. बाथरूममध्ये फिकट निळ्या रंगाची बादली वापरणे चांगले.

चप्पल अशी ठेवू नका

काही लोक आपल्या घरात बाथरूमसाठी चप्पल वेगळे ठेवतात. असे करण्यात काहीच गैर नाही. पण लक्षात ठेवा की, या चप्पल बाथरूमच्या आत ठेवू नयेत आणि तुटलेल्या असू नये याची काळजी घ्या.

​​टॉयलेट सीट आणि ओले कपडे

टॉयलेट सीट

तुमच्या बाथरूममधील टॉयलेट नेहमी स्वच्छ असावे. घाणेरडे टॉयलेट सीट आरोग्यास हानी पोहोचवते, ते देखील दोषपूर्ण मानले जाते.

ओले कपडे ठेवू नका

बाथरूममध्ये ओले कपडे ठेवणे ही खूप वाईट सवय आहे. यामुळे वास्तू दोष निर्माण होतो आणि त्याच वेळी ग्रहांची स्थितीही अशुभ ठरते.

केसं आणि नळ

तुटलेले केसं

काही लोकांना अशी सवय असते की ते आंघोळ करताना केस धुतात आणि तुटलेले केस तिथेच सोडतात. असे करणे शास्त्रात दोषपूर्ण मानले जाते. हे साफ करायला कधीही विसरू नका.

वाहता नळ

बाथरुममधील कोणताही नळ खराब झाला असल्यास त्याची त्वरित दुरुस्ती करावी. बाथरूममधला टपकणारा नळ म्हणजे पाण्यासारखा वाहणारा पैसा समजला जातो.

बाथरूममध्ये कचरा आणि आरसा

बाथरूममध्ये कचरा

काही लोकांना अशी सवय असते की ते घरातील टाकाऊ वस्तू आणि रद्दी बाथरूममध्ये ठेवतात. स्नानगृह ही आंघोळीची जागा आहे आणि कचरा ठेवण्याची जागा नाही, म्हणून असे करू नका.

फूटलेला आरसा

जर तुमच्या बाथरूममधील काच कोणत्याही कारणाने फुटला तुटला असेल तर तो बदलून टाका ती जागा लगेच साफ करा. एक फुटलेला किंवा तुटलेला आरसा देखील वास्तू दोषाचे कारण आहे.

Source link

remedy to remove vastu doshvastu remedy in marathiVastu Tipsvastu tips about bathroom in marathiवास्तुशास्त्रवास्तू उपायवास्तू दोषवास्तूनुसार बाथरूम कसे असावे
Comments (0)
Add Comment