kaalbhairav ashtami 2021 कालभैरव जयंती : कालाष्टमीचे महत्व मान्यता आणि कथा

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असते. मात्र कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कालभैरवाची जयंती असते. या दिवशी भगवान कालभैरवाने अवतार घेतला होता असे मानले जाते. या वर्षी, कालभैरव जयंती २७ नोव्हेंबर, शनिवारी येत आहे. या दिवशी भगवान भैरवांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. भगवान भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहेत. कालभैरव जयंती कधी आहे त्याचे महत्व मान्यता आणि कथा जाणून घेऊया…

कालभैरव जयंती कधी आहे
कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष अष्टमी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरु होते. शनिवारी पहाटे ०५ वाजून ४३ मिनिटे ते रविवारी २८ नोव्हेंबर २०२१ सकाळी ०६.०० पर्यंत कालाष्टमी राहील. कालभैरव अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत करावे. या दिवशी भगवान शंकरासमोर दिवा लावून तसेच, भगवान कालभैरवाची पूजा करावी, संध्याकाळी मंदिरात जाऊन भगवान भैरवाच्या मूर्तीसमोर चारमुखी दिवा लावा आणि त्यांची मनोभावे पूजा करा. देवाला फुले, जिलेबी, उडीद, पान, नारळ इत्यादी वस्तू अर्पण करा. यानंतर भगवंताच्या समोर आसनावर बसून कालभैरव चालीसाचा पाठ अवश्य करावा किंवा ॐ भैरवाय नम: मंत्राचा जप करावा.

utpatti ekadashi Ekadashi 2021 उत्पत्ती एकादशी व्रत; पूजाविधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

कथा अशी की…
शिव महा पुराणाच्या आधारे असे संगतात की, भगवान विष्णु आणि ब्रह्मा याच्यात संवाद चालला असता ब्रह्मा म्हणाले के, मीच या सृष्टीचा कर्ता असून सर्व देवांनी माझीच स्तुती करावी. हे ऐकून भगवान शिवांना क्रोध आला आणि त्यांनी ब्रह्माला शासन करण्यासाठी कालभैरवाची उत्पत्ती केली. ब्रह्माच्या पाच मस्तकांपैकी एक मस्तक कालभैरवाने उडवले. परंतु ब्रह्माच्या शिरच्छेदाबद्दल अपराधी भावना वाटू लागली आणि त्यामुळे कित्येक युगांपर्यंत, जो पर्यंत पापमुक्त होत नाही तो पर्यंत कालभैरवाचे ते मस्तक वाहत होते.

Newly Wed Couple Room नवविवाहित जोडप्याची खोली तयार करताना या गोष्टी लक्षात ठेवा

कालभैरव जयंती कथा
दुसरी एक कथा अशी सांगतात की, देवांचा राजा दक्षची कन्या सतीने मनोमन भगवान शिवालाच आपला वर मानले होते आणि विवाह केला, परंतु हे दक्षाला मान्य नव्हते, कारण शिव स्मशानात राहतो, अंगाला प्रेतभस्म लावतो आणि सोबत भुते असतात. नंतर जेव्हा दक्षाने मोठा यज्ञ केला तेव्हा त्याने शिव सतील बोलावले नाही. परंतु सती न बोलावताहि यज्ञाला आली त्यामुळे दक्ष शिवाला दुषणे देउन, अर्वाच्य भाषेत शिव्याशाप करू लागला, हे सहन न होऊन सतीने तिथेच प्राणत्याग केला. हे पाहून शिवाला अतिशय दुःख झाले, आणि त्याने रागाने यज्ञाचा विध्वंस केला तसेच दक्षाचा वध केला. दुःख अनावर झाल्याने, शिव सतीचे प्रेत खांद्यावर घेऊन त्रिलोकात फिरु लागला. आणि यामुळे सृष्टीचा नाश होऊ लागला. ते पाहुन भगवन विष्णुने आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे तुकडे केले, तेव्हा हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. या शक्तिपीठांच्या रक्षणासाठी शिवाने कालभैरवाची उत्पत्ती केली, म्हणुन त्या त्या ठिकाणी कालभैरवाचे मंदिर असतेच अशी मान्यता आहे.
December 2021 डिसेंबरमध्ये या राशींना होईल त्रास, नुकसान होण्याची शक्यता

Source link

kaalbhairav ashtami 2021kaalbhairav ashtami 2021 in marathikaalbhairav ashtami signification and storykaalbhairav jayanti 2021 importancekalashtami kathaकार्तिक मासकालभैरव जयंतीकालभैरव जयंती 2021कालाष्टमी २०२१कालाष्टमीचे महत्व मान्यता आणि कथा
Comments (0)
Add Comment